शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बिनकामी ९५ टक्के संस्थांचे ‘पॅकअप्’ होणार

By admin | Updated: November 28, 2015 00:17 IST

तयारी सुरू : एकूण सहकारी संस्थांपैकी १९ टक्के संस्था बोगस

सांगली : जिल्ह्यातील एकूण ४0८९ सहकारी संस्थांपैकी १९ टक्के म्हणजे ७५९ संस्था बिनकामी निघाल्या आहेत. अंतरिम नोटिसा बजावलेल्या एकूण संस्थांपैकी जवळपास ९५ टक्के संस्थांचे ‘पॅकअप्’ निश्चित मानले जात आहे. अवसायनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्याने आता काही संस्थांची अस्तित्वासाठी धडपड सुरू झाली आहे. सांगली जिल्ह्यातील सहकाराचे जाळे मोठे असले तरी, यातील अनेक संस्था केवळ कागदोपत्री अस्तित्वात होत्या. राज्यातील तपासणी मोहिमेत जवळपास लाखाच्या घरात संस्था बोगस आढळून आल्या. सांगली जिल्ह्यातील चार हजारावर संस्थांची तपासणी केल्यानंतर, त्यातील १९ टक्के संस्था केवळ कागदोपत्री जिवंत असल्याचे दिसून आले. आता या सर्व संस्थांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांना अंतिम नोटिसा बजावण्यात येणार आहेत. त्यापूर्वी अंतरिम नोटिसांवरील सुनावणी ८ डिसेंबर रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे होणार आहे. यावेळी काही संस्थांना आपल्या अडचणी मांडण्याची तसेच कागदपत्रे सादर करून मुदत मागण्याची संधी मिळू शकते. शासकीय अनुदान किंवा शासनाकडून काही गोष्टींची पूर्तता न झाल्याने कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या संस्थांना संधी मिळू शकते. मात्र अशा संस्थांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे नोटिसा बजावलेल्या एकूण संस्थांपैकी ९५ टक्के संस्था अवसायनात निघण्याची शक्यता आहे. डिसेंबरअखेर ही प्रक्रिया चालणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अवसायनात निघणाऱ्या संस्थांची यादी जाहीर होणार आहे. सांगली जिल्ह्यातील संस्थांची संख्या आणखी घटणार आहे. यापूर्वी अनेक पतसंस्था, बँका, सूतगिरण्या अवसायनात काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापूर्वीच सहकारी संस्थांची संख्या घटली होती. आता पुन्हा कागदोपत्री अस्तित्वात असणाऱ्या संस्थांनाही अवसायनात काढण्यात येणार आहे. अशा संस्था बंद करून उर्वरित संस्थांच्या गुणात्मक वाढीकडे लक्ष देण्याच्यादृष्टीने ही मोहीम सहकार विभागाने हाती घेतली आहे. या मोहिमेत ज्या सहकारी संस्था नोंदणीकृत पत्त्यावर आढळून येणार नाहीत किंवा ज्यांचा कोणताही ठावठिकाणा नाही, त्यांच्यासंदर्भात जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून त्या संस्था बंद असल्याबाबतची खातरजमा करण्यात आली. पूर्णपणे बंद असलेल्या व कार्यस्थगित संस्था अवसायनात घेण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा उपनिबंधकांनी यापूर्वीच दिल्या आहेत. (प्रतिनिधी)सर्वेक्षण अहवालानुसार जिल्ह्यातील सहकारी संस्थांची स्थितीतालुकाएकूण चालू बंदबिनकामीगायबबंद होणाऱ्यामिरज १२१४८११८४२३६८३४0३जत २४५२२९४१२——१६कवठेमहांकाळ २१९१८८८२३——३१पलूस३५७२८२६८७——७५तासगाव २५५२१२३२११९४३कडेगाव २१२१९८१४————१४खानापूर२१0१८११५५९२९शिराळा ३८६३३८३८——१0४८वाळवा७७४६८४९0————९0आटपाडी २१७२0७१0————१0एकूण ४0८९३,३३0३३४३0४१२१७५९