शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदय शस्त्रक्रियेकरीता 95 बालके मुंबईला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:34 IST

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एस. आर. सी. सी. हॉस्पिटल मुंबई येथे मोफत हृदय शस्त्रक्रियेकरिता सांगली जिल्ह्यातील 95 बालके त्यांच्या पालकांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथून तीन बसमधून रवाना करण्यात आली. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती सुषमा नायकवडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते.

ठळक मुद्दे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हृदय शस्त्रक्रियेकरीता 95 बालके मुंबईला रवाना

सांगली: राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एस. आर. सी. सी. हॉस्पिटल मुंबई येथे मोफत हृदय शस्त्रक्रियेकरिता सांगली जिल्ह्यातील 95 बालके त्यांच्या पालकांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथून तीन बसमधून रवाना करण्यात आली.

यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती सुषमा नायकवडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अत्यंत प्रभावीपणे राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतून 0 ते 18 वर्षे वयोगटातील सर्व अंगणवाडी व शालेय बालकांची तपासणी केली जाते. त्यातून संदर्भित करण्यात आलेल्या बालकांवर आवश्यक त्या इतर व हृदय शस्त्रक्रिया निरनिराळ्या योजनेतून पूर्णपणे मोफत करून घेतल्या जात आहेत. या कार्यक्रमांतर्गत दिनांक 21 व 22 नोव्हेंबर 2019 रोजी हृदयरोग संशयित लाभार्थ्यांचे मोफत इको तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

तपासणी मधून गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रियेकरीता संदर्भित करण्यात आलेल्या 95 लाभार्थ्यांना आज एस.आर.सी.सी. हॉस्पिटल मुंबई येथे पाठविण्यात आले. या हॉस्पिटलमध्ये मोफत पूर्वतपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

अत्यंत गुंतागुंतीच्या व अतिखर्चिक अंदाजित 5 लाख प्रती शस्त्रक्रियाप्रमाणे सर्व शस्त्रक्रियेकरीता सरासरी अंदाजित 4 कोटी 50 लाख इतका अपेक्षित असून संबंधित रूग्णालय व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत संदर्भसेवा या निधीमधून हा खर्च करण्यात येणार आहे.सन 2014 पासून प्रतिवर्षी सातत्याने सलग 6 वर्षे जिल्ह्यातील 950 हून अधिक बालकांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या असून 1 हजार शस्त्रक्रिया पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू आहे. सन 2013-14 पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून आज अखेर 950 हृदय शस्त्रक्रिया व 7 हजार 716 इतक्या इतर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या असून सन 2013 पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्हा हा राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. यावेळी मान्यवरांनी बालकांना शुभेच्छा दिल्या व खाऊचे वाटप केले. 

टॅग्स :Healthआरोग्यSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी