शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

सांगलीतील सुवर्ण कारागीराला नऊ लाखांचा गंडा, कामगाराचा पोबारा; दोघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 18:27 IST

सांगली येथील गावभागातील सुशांत सदाशिव भुर्के या सुवर्णकाराला कामगाराकडूनच सुमारे नऊ लाखाचा गंडा बसल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उजेडात आला. ३१८ ग्रॅम वजनाच्या (३२ तोळे) सोन्याच्या ९१ अंगठ्या घेऊन कामगाराने पलायन केले आहे. याप्रकरणी मुख्य संशयित कामगार मुजाहिद शेख व त्याचा साथीदार रियाजुल मिदा (दोघे रा. पश्चिम बंगाल) यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे३१८ ग्रॅम वजनाच्या (३२ तोळे) सोन्याच्या ९१ अंगठ्या घेऊन कामगाराचे पलायन सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हामुजाहिद शेखविरुद्ध राज्यातील काही शहरात गुन्हेशोध घेण्याचे शहर पोलिसांना आव्हान

सांगली ,दि. ०४ :  येथील गावभागातील सुशांत सदाशिव भुर्के या सुवर्णकाराला कामगाराकडूनच सुमारे नऊ लाखाचा गंडा बसल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उजेडात आला. ३१८ ग्रॅम वजनाच्या (३२ तोळे) सोन्याच्या ९१ अंगठ्या घेऊन कामगाराने पलायन केले आहे. याप्रकरणी मुख्य संशयित कामगार मुजाहिद शेख व त्याचा साथीदार रियाजुल मिदा (दोघे रा. पश्चिम बंगाल) यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुशांत भुर्के हे गावभागातील वीरभद्र मंदिरासमोर राहतात. घरातच त्यांचा दागिने बनविणे व पॉलिश करुन देण्याचा व्यवसाय आहे. त्यांना दागिने पॉलिश करण्यासाठी कामगाराची गरज होती. संशयित रियाजुल मिदा हा पूर्वी काही कारागीरांकडे कामाला होता. तो सध्या कोल्हापुरातील एका कारागीराकडे काम करीत होता. पण सांगलीतच राहायला होता. त्याने १५ आॅक्टोबर २०१७ रोजी मुजाहिद शेख यास भुर्के यांच्याकडे नेले. रियाजुल मिदा ओळखीचा असल्याने भुर्के यांनी शेखला कामावर ठेवले.

३१ आॅक्टोबरला दुपारी अडीच वाजता भुर्के यांनी शेखला ३३१८ ग्रॅम वजनाच्या ९१ सोन्याच्या अंगठ्या पॉलिश करण्यासाठी दिल्या होत्या. शेखने या अंगठ्या ताब्यात घेतल्या. पाच-दहा मिनिटे अंगठ्या पॉलिश करण्याचे नाटक केले. त्यानंतर गडबड असल्याचे भासवत या अंगठ्या कपाटात ठेवत असल्याचा दिखावा करीत,  सेठ, आया मै दो मिनट मे, असे म्हणून त्याने दुकानातून पोबारा केला. दुपारचे चार वाजले तरी शेख परत आला नाही, म्हणून भुर्के यांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला. परंतु मोबाईल बंद होता.

सायंकाळी सहापर्यंत भुके त्याची प्रतीक्षा करीत दुकानात बसले होते. मात्र तरीही तो आला नाही. शेवटी त्यांनी कपाटात अंगठ्या आहेत का नाही, याची पाहणी केली. पण कपाटाला कुलूप होते. भुर्के यांनी कुलूप तोडून पाहिले असता, त्यामध्ये अंगठ्या नव्हत्या. हा प्रकार पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी शेखचा साथीदार रियाजुल मिदा याच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. मात्र त्याचाही मोबाईल बंद होता. मग मात्र भुर्के यांनी शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला.

पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड यांचे पथक गेल्या दोन दिवसांपासून शेख व मिदाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मिदा कोल्हापूर येथे काम करीत असलेल्या सुवर्ण कारागीराकडेही ते जाऊन आले. तरीही मिदा तसेच शेखचा सुगावा लागला नाही.

मुजाहिद शेखविरुद्ध राज्यातील काही शहरात गुन्हेमुजाहिद शेख याने यापूर्वीही राज्यातील काही शहरात सुवर्ण कारागीरांकडे नोकरीच्या बहाण्याने काम करताना त्यांचे दागिने घेऊन पोबारा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मिदासोबत त्याने ठरवूनच भुर्के यांच्या दुकानातील दागिन्यांवर डल्ला मारल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध कुठे गुन्हे दाखल आहेत का? याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.

शोध घेण्याचे आव्हानशेख व मिदा या दोघांचा शोध घेणे शहर पोलिसांना आव्हान बनले आहे. भुर्के यांनी शेखला कामाला घेताना त्याचा बायोडाटाही घेतला नाही. त्याचा फोटोही घेतला नाही. केवळ मोबाईल नंबर घेतला आहे. शेखचे नाव काय आहे, हेही त्यांना माहिती नव्हते. गेले दोन दिवस सराफ कट्टा, गावभाग परिसरात चौकशी करुन पोलिसांनी त्याचे नाव निष्पन्न केले आहे. या माहितीच्याआधारे पोलिस त्याचा शोध घेत आहेत. येत्या एक-दोन दिवसात तपासासाठी शहर पोलिसांचे पथक पश्चिम बंगालला रवाना होणार आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाGoldसोनं