लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : ‘लोकमत’चे संस्थापक स्वातंत्रसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त इस्लामपूर येथे जायंटस् ग्रुप व ‘लोकमत’च्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात ८५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.
शिबिराचे उद्घाटन तहसीलदार रवींद्र सबनीस, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नरसिंह देशमुख, डॉ. पी. टी. शहा, डॉ. राणोजी शिंदे, डॉ. अतुल मोरे, रणजित मंत्री, जायंटस्चे अध्यक्ष दुष्यंत राजमाने, कार्यवाह रणजित जाधव, अॅड. श्रीकांत पाटील, डॉ. नितीन पाटील, भूषण शहा, राजू ओसवाल, जायंटस् सहेली अध्यक्षा, बांधकाम सभापती सुनीता सपकाळ, एस. टी. आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा घोलप-पाटील यांच्या उपस्थितीत झाले.
जनमानसांवर ठसा उमटविलेल्या ‘लोकमत’ने कोरोनाच्या काळातील नेमकी गरज ओळखून रक्तदानासारख्या श्रेष्ठ महायज्ञाची केलेली सुरुवात स्तुत्य आहे. त्यातून नेमक्या गरजेच्या वेळी मिळणारे रक्ताचे दान सत्पात्री ठरणार आहे, असे गौरवोद्गार तहसीलदार सबनीस यांनी काढले.
शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ८५ दात्यांनी रक्तदान केले. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी स्वत:चे १८ वे रक्तदान करत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. जायंटस्चे संस्थापक-सदस्य गजानन परब यांनी कारकिर्दीतील १११ वे रक्तदान केले.
राजारामबापू रक्तपेढीच्यावतीने रक्तसंकलन करण्यात आले. माजी नगरसेवक कपिल ओसवाल, सनी खराडे, ‘स्वाभिमानी’चे भागवत जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सागर मलगुंडे यांनी सहकारी कार्यकर्त्यांसह येऊन रक्तदान केले. ‘भाजयुमो’चे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक, विकास आघाडीचे विक्रम पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव, अरुण कांबळे, आयूब हवलदार, डॉ. सदानंद जोशी, अभियंते अनिल पाटील, नितीन शहा, उद्योजक उदय देसाई, राजश्री पाटील, अनुराधा पाटोळे, गीता पाटील या सखी मंचच्या विभाग प्रतिनिधींनी शिबिराला भेट दिली. सखी मंच संयोजिका प्रा. वैशाली पाटील यांनी आभार मानले.