शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

सांगलीकरांना दिलासा!, महापालिकेचे करवाढ नसलेले ८२३ कोटींचे अंदाजपत्रक सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 11:35 IST

आयुक्तांकडून नव्या योजनांसाठी तरतूद

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी गुरुवारी २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता ८२३ कोटी रुपयांचा कोणतीही करवाढ नसलेला व शिकलीचा अर्थसंकल्प सादर केला. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पुढील वर्षभरात कोणताही अतिरिक्त कर द्यावा लागणार नाही.महापालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रशासकीय अंदाजपत्रकच अंतिम अंदाजपत्रक असणार आहे. आयुक्त तथा प्रशासक असलेल्या सुनील पवार यांनी अनेक महत्त्वाकांक्षी योजनांसाठी कोट्यवधी रुपयांची तजवीज करून वास्तवदर्शी आकड्यांचा विचार करून अर्थसंकल्प सादर केला असल्याचे स्पष्ट केले. स्थायी समितीच्या सभागृहात पार पडलेल्या सभेत लेखाधिकारी अभिजित मेंगडे यांनी प्रशासकीय अर्थसंकल्प आयुक्त सुनील पवार यांच्याकडे सादर केला.यावेळी नगर सचिव चंद्रकांत आडके उपस्थित होते. मागील तीन वर्षांतील कर संकलनाचे आकडे गृहीत धरून अंदाजपत्रकात समावेश केला. त्यांनी २०२३-२४चा ९८१ कोटींचे सुधारित अंदाजपत्रकही मांडले. जमा व खर्चाचा विचार करता २९ लाख ५३ हजार रुपये शिल्लक अपेक्षित धरण्यात आली आहे.यावेळी आयुक्त म्हणाले की, नागरिकांवर कोणताही कराचा अतिरिक्त बोजा आम्ही टाकलेला नाही. उत्पन्नवाढीचे अनेक उपाय शोधताना शिक्षण व आरोग्याच्या अनेक योजना वर्षभरात राबविण्यात येतील. त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. प्रदूषणमुक्त शहरांची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. आजवर बजेटमध्ये अवास्तव उत्पन्नाचे आकडे दाखवून खर्चाच्या वाढीव तरतुदी सदस्य मंडळाच्या काळात होत होत्या. आम्ही तीन वर्षांतील अंतिम बजेटमधील आकड्यांचा विचार करून वास्तवदर्शी संकल्प केला आहे.

असा आहे अर्थसंकल्प

  • अपेक्षित करसंकलन : ८२३ कोटी २८ लाख ४७ हजार ३१३
  • अपेक्षित खर्च : ८२२ कोटी ९९ लाख १२ हजार ३६
  • शिल्लक : २९ लाख ३५ हजार २७७
टॅग्स :SangliसांगलीBudgetअर्थसंकल्प 2024