शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

जिल्ह्यातील घरपट्टीत आठ कोटींची भर..!

By admin | Updated: November 25, 2015 00:32 IST

मागणी २६ कोटींची : शासनाचे नवे धोरण

सांगली : इमारत व जमिनीवरील घरपट्टी आकारणीत राज्य शासनाने केलेल्या सुधारणेअंतर्गत जिल्ह्यातील ७0४ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात घरपट्टी वाढ होणार आहे. जिल्ह्यातील एकूण घरपट्टीची मागणी सध्या २६ कोटी ४२ लाख इतकी आहे. यात आणखी ८ कोटीची भर पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६0 नुसार इमारती व जमिनीवरील कर आकारणीबाबत राज्य शासनाने २१ नोव्हेंबर २0१५ रोजी अधिसूचना जारी केली होती. त्यापूर्वीच्या अधिसूचनेत प्रति शंभर रुपये भांडवली मूल्यावर आधारित किमान दर निश्चित करण्यात आला होता. त्याऐवजी आता प्रति १000 रुपये भांडवली मूल्यावर किमान दर निश्चित करण्यात आले आहेत. सुधारित मालमत्ता कर हा लगत वर्षाच्या आकारणीच्या ३0 टक्क्यांपेक्षा अधिक आकारता येणार नाही. नव्या सुधारणेनुसार होणाऱ्या वाढीचा विचार केला, तर जिल्ह्याच्या एकूण घरपट्टी मागणीत ८ कोटीची भर पडण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार प्रति चौरस फुटाऐवजी इमारतीच्या एकूण भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणीचा प्रस्ताव होता. त्यास मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. आक्षेप व हरकती नोंदविल्यानंतर शासनाने सुधारित अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यानंतर आता नव्या अधिसूचनेनुसार कर आकारणीने किमान दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)शासनाने २१ नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी केली. त्यापूर्वी प्रति शंभर रुपये भांडवली मूल्यावर आधारित किमान दर निश्चित करण्यात आला होता. त्याऐवजी आता प्रति हजार रुपये भांडवली मूल्यावर किमान दर निश्चित करण्यात आले आहेत.