शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

तब्बल ६७३ प्राध्यापक जिल्ह्यात ‘सीएचबी’वर : संघर्ष कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:48 IST

जिल्ह्यातील ३९ महाविद्यालयांमध्ये ६७३ प्राध्यापक तासिका तत्त्वावर (सीएचबी) कार्यरत आहेत. दरवर्षी होत असलेली प्राध्यापकांची निवृत्ती, विद्यापीठाकडून येत असलेल्या सूचनांचा विचार करता, सीएचबीधारक प्राध्यापकांवरील ताण वाढत आहे. नेट, सेटसह

ठळक मुद्दे ताणतणावासह चिंतेत वाढ

शरद जाधव ।सांगली : जिल्ह्यातील ३९ महाविद्यालयांमध्ये ६७३ प्राध्यापक तासिका तत्त्वावर (सीएचबी) कार्यरत आहेत. दरवर्षी होत असलेली प्राध्यापकांची निवृत्ती, विद्यापीठाकडून येत असलेल्या सूचनांचा विचार करता, सीएचबीधारक प्राध्यापकांवरील ताण वाढत आहे. नेट, सेटसह पीएच.डी. असलेले अनेकजण यात असून, शासनस्तरावरून घोषित करण्यात आलेली ४० टक्के प्राध्यापक भरती प्रक्रियाही गतीने होत नसल्याने प्राध्यापकांच्या चिंतेत भर पडली आहे.

२०१४ पासून कायमस्वरूपी प्राध्यापक भरती प्रक्रिया बंद करण्यात आल्याने, अनेक प्राध्यापक आज ना उद्या कायम होऊ, या आशेवर कार्यरत आहेत. आता सीएचबीधारकांना मिळणाऱ्या रकमेत थोडीफार वाढ झालेली असली तरी, एकाच महाविद्यालयात काम करण्याचे हमीपत्र लिहून घेत असल्याने आर्थिक नुकसानही सोसावे लागत आहे. त्यात सध्या कायमस्वरूपी प्राध्यापकांच्या निवृत्तीचे प्रमाण लक्षणीय असताना, त्या प्रमाणात भरती होत नाही. यामुळे कामकाजाचा ताण सीएचबीधारकांवर वाढत आहे.

कायमस्वरूपी प्राध्यापक भरती करता येत नसल्याने, ही नियुक्ती करतानाही सेट, नेट उत्तीर्ण असणे अथवा पीएच.डी. असणे बंधनकारक असते.शैक्षणिक क्षेत्रात करिअर करण्याच्या हेतूने आलेले हे तरुण आपल्या अध्यापनाशिवाय इतरही कामकाजात उत्साहाने भाग घेत असतात. त्यामुळे अनेकवेळा अशैक्षणिक कामे त्यांच्यावरच लादली जातात, तर पूर्णवेळ प्राध्यापकांची यातून सुटका होत असते.

विद्यापीठस्तरीय परीक्षांना सुरूवात होणार आहे. या परीक्षेसाठी पर्यवेक्षणासाठीही सीएचबीवर काम करणारे प्राध्यापक कार्यरत असतात. मिळणाऱ्या तुटपुंजा रकमेव्यतिरिक्त थोडीफार आर्थिक मदत मिळण्यासाठी त्यांचा प्रयत्न चाललेला असतो. महाविद्यालयाची कसोटी पाहणारे नॅक मूल्यांकन असो अथवा इतर कोणतीही तपासणी, त्याच्या तयारीतही सीएचबीधारक हिरीरीने भाग घेत असल्याने त्यांना समाधानकारक पगार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. .अनियमित : पगार‘सीएचबी’धारकांना मिळणारे तुटपुंजे वेतनही अनियमितपणे मिळत आहे. वास्तविक दरमहा वेतन मिळणे आवश्यक असताना काही ठिकाणी दोन महिन्यातून, तर काही ठिकाणी तीन महिन्यांनी वेतन मिळत आहे. मिळणारे वेतन दरमहा व थेट खात्यावर मिळण्याची अपेक्षा सीएचबीधारकांना आहे.भरती प्रक्रिया नावालाच२०१४ मध्ये भरतीवर बंदी आल्यानंतर काही दिवसांपूर्वीच शासनाने भरतीस परवानगी दिली आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून त्यावर वेगाने कार्यवाही होताना दिसत नाही. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील केवळ एकाच महाविद्यालयाने भरती प्रक्रिया राबविली आहे. त्यामुळे ४० टक्क्यांची का होईना, भरती प्रक्रिया गतीने होणे आवश्यक आहे.

टॅग्स :SangliसांगलीProfessorप्राध्यापक