शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या अर्थकारणाला वेग येणार; ६५५ उद्योग सुरु, मात्र १४४ कलम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 10:33 IST

यासह परवानगी पोर्टलवर प्राप्त झालेले अर्ज असे एकूण 655 उद्योग व त्यांनी मागणी केलेल्या 189 वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती मा. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

ठळक मुद्दे- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरीसायं. 7 ते सकाळी 7 या कालावधीत अत्यावश्यक नसलेल्या कारणांनासाठी सर्व व्यक्तींच्या संचारास मनाई

सांगली : सांगली जिल्ह्यात 03 मे अखेर अत्यावश्यक असणाऱ्या 416 उद्योगांना व यातील 6637 कर्मचाऱ्यांची ऑफलाईन परवानगी देण्यात आली आहे. यात एमआयडीसी मधील 184 युनिट व 1945 कर्मचारी तर या व्यतिरिक्त 232 युनिट व 4692 कर्मचारी यांचा समावेश आहे. यासह परवानगी पोर्टलवर प्राप्त झालेले अर्ज असे एकूण 655 उद्योग व त्यांनी मागणी केलेल्या 189 वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती मा.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

यामध्ये अत्यावश्यक उद्योग घटकांमध्ये अन्न पदार्थाचे उत्पादन करणारे उद्योग डेअरीसह 202 युनिट व त्यामधील 4871 कर्मचारी, पशु/पोल्ट्रीखाद्य उद्योग 39 व त्यामधील 375 कर्मचारी, कोल्ड स्टोअरेज/वेअर हाउस 71 युनिट व त्यामधील 550 कर्मचारी,कॉरोगेटेड बॉक्स उत्पादन करणारे 34 युनिअ व त्यामधील 310 कर्मचारी, औषधे व वैद्यकीय साधने उत्पादन करणारे 35 युनिट व त्यामधील 284 कर्मचारी, इतर- पॅकिंगशी सबंधित उद्योग 35 व त्यमधील 274 कर्मचारी, असे एकूण 416 युनिट व त्यामधील 6637 कर्मचारी यांना आत्तापर्यंत परवानगी देण्यात आली आहे.सांगली जिल्ह्यात कलम 144 लागूजिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य शासनाने 17 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्या अनुष्ंगाने सांगली जिल्ह्यात 4 मे ते 17 मे 2020 रोजी 24.00 पर्यत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वयेसायंकाळी 7 वाजले नासून सकाळी 7 वाजेपर्यत अत्यावश्यक नसलेल्या कारणांसाठी सर्व व्यक्तींच्यासंचारास जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनाई केली आहे. सदरचा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असणाऱ्या व अन्य अत्यावश्यक सेवा सुविधा व वस्तू यांच्या पुरवठ्याशी सबंधित व्यक्ती व वाहने आणि कोणत्यही स्वरूपाच्या निकडीच्या प्रसंगासव शासकीय कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही.

 

टॅग्स :MIDCएमआयडीसीcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली