शिराळा
: शिराळा तालुक्यात शुक्रवारी नवीन ६५ काेराेनाबाधित आढळून आले. आतापर्यंत ही एका दिवसातील सर्वात माेठी रुग्णसंख्या आहे. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात ३५ रुग्ण दाखल झाल्याने येथे आता नवीन रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत. शुक्रवारी दिवसभरात १६३ चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये यामध्ये मणदूर येथे ९, शिराळा व चिखलवाडी येथे प्रत्येकी ८, कांदे येथे ५, चिखली येथे ४, देववाडी, मांगले, सोनवडे येथे प्रत्येकी ३, आटुगडेवाडी, चरण, मादळगाव, निगडी, सांगाव येथे प्रत्येकी २ तर आंबेवाडी, अंत्री बुद्रुक, बेलेवाडी, बिळाशी, चिंचोली, गिरजवडे, इंगरुळ, जांभळेवाडी, कोकरूड, मालेवाडी, कामेरी, कुरळप येथे प्रत्येकी १ असे ६५ रुग्ण आढळून आले. तालुक्यात ३६३ रुग्ण उपचार घेत आहेत. मिरज कोविड रुग्णालयात १, शिराळा कोविड सेंटर येथे ८, शिराळा कोविड रुग्णालयात ३५, खासगी रुग्णालयात १ रुग्ण दाखल आहे. ३१८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. दुसऱ्या लाटेत आत्तापर्यंत पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.