शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक स्टडी रिपोर्ट
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
6
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
7
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
8
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
9
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
10
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
11
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
12
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
13
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
14
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
15
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
16
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
17
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
18
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
19
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
20
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?

जिल्ह्यात कोरोनाचे ६२२ नवे रुग्ण; ११ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:24 IST

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत रविवारी चांगलीच घट झाली. दिवसभरात ६२२ नवे रुग्ण आढळून येतानाच १०७१ जण ...

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत रविवारी चांगलीच घट झाली. दिवसभरात ६२२ नवे रुग्ण आढळून येतानाच १०७१ जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यातील ११ जणांचा मृत्यू झाला. म्युकरमायकोसिसचे नवीन एक रुग्ण, तर दोन रुग्णांचा मृ्त्यू झाला.

प्रशासनाकडून चाचण्यांचे प्रमाण कायम ठेवले असतानाही रुग्णसंख्या घटल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील ११ जणांचा मृत्यू झाला त्यात सांगली १, मिरज २, खानापूर २, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

आरोग्य यंत्रणेने आरटीपीसीआर अंतर्गत ३९७३ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात २३४ जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ७८९२ जणांच्या नमुने तपासणीतून ४०९ जण पॉझिटिव्ह आढळले.

उपचार घेत असलेल्या ८८८० रुग्णांपैकी ९६० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ८२१ जण ऑक्सिजनवर तर १३९ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील नवीन २१ रुग्ण उपचारास दाखल झाले.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १,७०,४०६

उपचार घेत असलेले ८,८८०

कोराेनामुक्त झालेले १,५७,०१७

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४,५०९

रविवारी दिवसभरात

सांगली ९७

मिरज ४३

आटपाडी ६१

कडेगाव ५८

खानापूर ३४

पलूस २७

तासगाव ३७

जत २५

कवठेमहांकाळ ४२

मिरज तालुका ६७

शिराळा ७

वाळवा १२४