शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेच्या वीजबिलात ६० लाखाचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 10:41 IST

Muncipal Corporation, sangli सांगली महापालिकेच्या वीज बिलामध्ये ५० ते ६० लाखाचा घोटाळा झाला आहे. एका खासगी संस्थेकडे वीज बिलाचा भरणा केला जात होता. या संस्थेने महावितरणकडे पैसेच भरले नसल्याची बाब समोर आली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी घोटाळ्याला दुजोरा दिला असून घोटाळ्याची कबुली दिली आहे. त्यामुळे विद्युत व लेखा विभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

ठळक मुद्देसांगली महापालिकेच्या वीजबिलात ६० लाखाचा घोटाळाआयुक्तांचा दुजोरा : विद्युत व लेखा विभाग संशयाच्या भोवऱ्यात

सांगली : महापालिकेच्या वीज बिलामध्ये ५० ते ६० लाखाचा घोटाळा झाला आहे. एका खासगी संस्थेकडे वीज बिलाचा भरणा केला जात होता. या संस्थेने महावितरणकडे पैसेच भरले नसल्याची बाब समोर आली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी घोटाळ्याला दुजोरा दिला असून घोटाळ्याची कबुली दिली आहे. त्यामुळे विद्युत व लेखा विभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

महापालिकेचे मुख्यालय, विविध कार्यालये, पाणीपुरवठा, दिवाबत्तीसह विविध विभागांची वीज बिले दरमहा विद्युत विभागाकडे येतात. या बिलापोटीची रक्कम शहरातील एका खासगी वीज बिल भरणा केंद्राकडे जमा केली जाते. या केंद्राच्यावतीने बिलाची रक्कम महावितरण कंपनीकडे जमा होते. पण गेल्या वर्षभरापासून अनेक विभागांची बिले भरली गेलेली नाहीत. काही महिन्यांपूर्वी वीज महावितरण कंपनीकडून महापालिकेला वीज बिल भरण्याबाबत पत्र पाठविल्यानंतर हा प्रकार समोर आल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.याच काळात महापालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरू असल्याने त्याकडे पदाधिकारी, नगरसेवकांनी फारसे लक्ष दिले नाही. पण प्रशासनातील वरिष्ठांना हा प्रकार माहीत होता. जवळपास कोटीची बिले भरली गेली नसल्याचे समजते. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावर परस्परच पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

महावितरण कंपनीतील एका अधिकाऱ्यामुळे ही बाब नागरिक जागृती मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांना कळाली. त्यांनी तातडीने आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे तक्रार केली आहे. आता आयुक्तांनीही घोटाळ्याला दुजोरा दिला आहे. यासंदर्भात पोलिसात तक्रार केल्याचे सांगितले.महापालिकेचे वीज बिल एका भरणा केंद्राच्या कर्मचार्‍याकडे धनादेश दिले होते. मात्र त्याने धनादेशाची रक्कम दुसर्‍या वीज ग्राहकाच्या बिलापोटी वजा केली आणि ग्राहकाकडून रोख पैसे घेतले. यातून महापालिकेची फसवणूक झाली आहे. याबद्दल विद्युत विभागाचे अमर चव्हाण यांनी आठवडभरापूर्वीच बिल देणारे कर्मचारी, वीज बिल भरणा करून घेणार्‍या संस्थेचे कर्मचारी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे, असे कापडणीस यांनी सांगितले.

महापालिकेचे अधिकारी व भरणा केंद्राने संगनमताने गैरव्यवहार केल्याचे समजते. हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. वीज बिलाच्या थकबाकीची रक्कमही कोटीच्या घरात दिसते. त्यामुळे आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा व संबंधित अधिकाऱ्यावर कारवार्ई करावी.- सतीश साखळकर,

जिल्हाध्यक्ष नागरिक जागृती मंच

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली