नुकसानग्रस्त 59 टक्के पीक क्षेत्राचा पंचनामा, उर्वरित पंचनामेही गतीने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:17 AM2019-08-24T11:17:58+5:302019-08-24T11:20:04+5:30

पुरामुळे जिल्ह्यातील एकूण 249 गावांतील नजरअंदाजे 66098.50 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यापैकी 39157.66 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा करण्यात आला आहे. ही टक्केवारी 59.24 टक्के असून उर्वरित क्षेत्राचा पंचनामा गतीने सुरू आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

59 per cent of the damaged crop area started at Panchanama, the rest of the pancamacha also started at speed | नुकसानग्रस्त 59 टक्के पीक क्षेत्राचा पंचनामा, उर्वरित पंचनामेही गतीने सुरू

नुकसानग्रस्त 59 टक्के पीक क्षेत्राचा पंचनामा, उर्वरित पंचनामेही गतीने सुरू

Next
ठळक मुद्देनुकसानग्रस्त 59 टक्के पीक क्षेत्राचा पंचनामाउर्वरित पंचनामेही गतीने सुरू

सांगली : पुरामुळे जिल्ह्यातील एकूण 249 गावांतील नजरअंदाजे 66098.50 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यापैकी 39157.66 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा करण्यात आला आहे. ही टक्केवारी 59.24 टक्के असून उर्वरित क्षेत्राचा पंचनामा गतीने सुरू आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

पुरामुळे बाधित पीक क्षेत्राच्या गावांची संख्या 249 असून यातील 1 लाख 20 हजार 231 बाधित शेतकऱ्यांचे 66098.50 हेक्टर क्षेत्र बाधित आहे. यापैकी 78 हजार 653 शेतकऱ्यांच्या 39 हजार 157.66 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा झाला आहे.

यामध्ये मिरज तालुक्यातील 27 गावातील 29 हजार 242 बाधित शेतकऱ्यांचे 14 हजार 838 हेक्टर क्षेत्र बाधित असून 15 हजार 571 शेतकऱ्यांच्या 11286.05 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा झाला आहे. वाळवा तालुक्यातील 44 गावातील 33 हजार 290 बाधित शेतकऱ्यांचे 16 हजार 190 हेक्टर क्षेत्र बाधित असून 22 हजार 490 शेतकऱ्यांच्या 10389.74 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा झाला आहे.
शिराळा तालुक्यातील 95 गावातील 36 हजार 250 बाधित शेतकऱ्यांचे 19 हजार 636 हेक्टर क्षेत्र बाधित असून 22 हजार 681 शेतकऱ्यांच्या 7588.65 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा झाला आहे. पूलस तालुक्यातील 31 गावातील 19 हजार 240 बाधित शेतकऱ्यांचे 14 हजार 680 हेक्टर क्षेत्र बाधित असून 15 हजार 419 शेतकऱ्यांच्या 8901.84 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा झाला आहे.

तासगाव तालुक्यातील 4 गावातील 994 बाधित शेतकऱ्यांचे 483 हेक्टर क्षेत्र बाधित असून 623 शेतकऱ्यांच्या 419.52 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा झाला असून कडेगाव तालुक्यातील 48 गावातील 1 हजार 869 शेतकऱ्यांच्या 571.86 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा झाला आहे.

 

Web Title: 59 per cent of the damaged crop area started at Panchanama, the rest of the pancamacha also started at speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.