शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

सांगलीत लोकसभा निवडणुकीवर राहणार ५७ चित्रीकरण पथकांची नजर

By अशोक डोंबाळे | Updated: April 22, 2024 15:33 IST

प्रत्येक हालचाल चित्रीकरणाद्वारे टिपणार : वस्तुस्थिती येणार समोर

सांगली : सांगली लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचारादरम्यान सभा, बैठका, रॅली, कॉर्नर सभा आदींवर लक्ष ठेवण्यासाठी ५७ व्हिडीओ चित्रीकरण पथके जिल्हाभर तैनात केली जाणार आहेत.आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होतेय की नाही, प्रचारासाठी वापरण्यात येणारी वाहने, मनुष्यबळ, झेंडे, फुले-हार आदींचे चित्रीकरण पथकांद्वारे करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १८ लाख ६५ हजार ९६० मतदार आहेत. २५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सध्या प्रचाराचा जोर वाढत असून, उमेदवारांनी लोकसभा क्षेत्र पिंजून काढण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. दुसरीकडे प्रशासनानेही तयारी पूर्ण केली आहे.

एक दिवसाचे प्रशिक्षणजिल्हाभरात तैनात केलेल्या चित्रीकरण पथकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामध्ये चित्रिकरणाचे महत्त्व लक्षात आणून दिले आहे. कोणकोणत्या हालचाली, कार्यक्रम, सभा, बैठका, प्रचार आदींमधील मनुष्यबळ, त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आदींबाबत पथकांना मार्गदर्शन करण्यात आले.

विविध प्रक्रियांचे चित्रीकरणलोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सध्या जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीपासून तर मतदान प्रकिया पार पडेपर्यंत ठिकठिकाणच्या राजकीय, सामाजिक हालचाली या चित्रीकरणाद्वारे टिपण्यात येणार आहेत. याशिवाय उमेदवारांचा प्रचार, सभा, बैठका, कॉर्नर सभा, रॅली, त्यातील वाहने, प्रचारातील मनुष्यबळ, सभा-बैठकांसाठी वापरण्यात येणाऱ्या खुर्च्या, फुले-हार आदींचे व्हिडीओ चित्रीकरण या पथकाद्वारे केले जाणार आहे.

चित्रीकरण पुरावा म्हणून नोंदविला जाणारएखाद्या ठिकाणी आचारसंहितेचे पालन झाले की नाही, त्याची शहानिशा करण्यासाठी चित्रीकरणाचा पुरावा विचारात घेतला जाणार आहे. याशिवाय उमेदवाराने घेतलेल्या परवानगीपेक्षा जास्त वाहने, खुर्च्या, बॅनर्स, झेंडे वापरले असल्यास त्यासाठी चित्रीकरणाचा पुरावा खर्चाचा हिशेब देताना विचारात घेतला जाणार आहे. उमेदवाराने दिलेला खर्च कमी आढळल्यास या चित्रीकरणाच्या वस्तुस्थितीनुसार खर्चाचा हिशेब देण्यास उमेदवाराच्या लक्षात आणून देण्यात येणार आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय पथकेविधानसभा मतदारसंघ - व्हिडीओ चित्रीकरण पथकेमिरज - ६सांगली - ७पलूस-कडेगाव - ७खानापूर - १०तासगाव-क.महांकाळ - ८जत - ७इस्लामपूर - ५शिराळा - ७एकूण - ५७

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४