शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: उमदीत उद्योगांसाठी ५३९ हेक्टर जागा आरक्षित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 18:43 IST

विठ्ठल ऐनापुरे जत : गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी कुंडी येथे नवीन स्वतंत्र एमआयडीसी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी ...

विठ्ठल ऐनापुरेजत : गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी कुंडी येथे नवीन स्वतंत्र एमआयडीसी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी आता सुरू आहे. त्यादृष्टीने उमदी (ता. जत) येथे ५३९ हेक्टर, तर मोरबगी येथे २४ हेक्टर जागा उपलब्ध केली आहे. सांगली जिल्ह्यात उद्योग विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने याबाबत महत्त्वाची पावले उचलायला सुरुवात केली आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात औद्योगिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न सुरू आहे.जत हा दुष्काळी टापू, मागास व दुर्गम भाग असल्याने पहिल्या टप्प्यात त्याला कमी प्रतिसाद मिळाला आहे. तरी विस्तारित म्हैसाळ योजनेचे पाणी, विजयपुरा (विजापूर) गुहागर राष्ट्रीय महामार्गाची जोड आणि विजयपुरा आंतरराष्ट्रीय विमान सेवा या पायाभूत सुविधांमुळे उमदीचा औद्योगिकदृष्ट्या भाग्य खुलणार आहेत.

उमदी (ता. जत) याठिकाणी लोखंड कामाशी निगडित, म्हणजेच कमी पाण्यात होणारा उद्योग यावा, असा प्रयत्न आहे. विशेषतः रेल्वेच्या बोगी बनवण्याचा उद्योग आल्यास त्याचा निश्चित मोठा फायदा होऊ शकतो. मोरबगी येथे २४ हेक्टर क्षेत्र महसूल विभागाच्या ताब्यात आहे. ते महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचाही प्रस्ताव आहे. याबाबतचे निर्णय मंत्रालय पातळीवर होणार आहेत. मात्र, त्याचा निश्चित मोठा फायदा होऊ शकतो.

आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उद्याेजकांना फायदा होणारउमदी ते विजयपूर (कर्नाटक) आंतरराष्ट्रीय विमानतळातील अंतर ६४ किलोमीटर इतके आहे. आजघडीला विमान तळाचे काम सुरू झाले आहे. लवकरच ते कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत. त्यानुसार फक्त दीड तासाचा प्रवास आहे. भविष्यात विमानतळ सुरू झाल्यानंतर कर्नाटक सीमेपर्यंत राज्यमार्ग नियोजित आहे. अंतर एक तासावर येईल, त्याचा उद्योजकांना फायदा होऊ शकतो. उमदी ते सांगली अंतर १३१ किलोमीटर आहे. त्या तुलनेत उमदी औद्योगिक वसाहतीचा विजयपूर जिल्ह्याला अधिक फायदा होऊ शकतो.

टॅग्स :SangliसांगलीMIDCएमआयडीसी