शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मनाळमधील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 19:18 IST

ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे होडी उलटून मृत झालेल्या लोकांप्रती शोक व्यक्त करतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदतीची घोषणा केली.

सांगली - ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे होडी उलटून मृत झालेल्या लोकांप्रती शोक व्यक्त करतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदतीची घोषणा केली. त्यांनी याबाबतची माहिती भाजप पदाधिकाºयांना दिली. गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस सांगलीतील पूरपरिस्थिती पाहण्यासाठी आले होते. खराब हवामानामुळे त्यांना लष्कराने हेलिकॉप्टर न उतरविता परत जाण्याबाबत सूचना दिल्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर खाली न उतरताच परतले. जाताना त्यांनी मोबाईलवरून भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याशी संपर्क साधला. ब्रह्मनाळ येथील घटनेची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये मदत देण्यात येईल, असे सांगितले. याबाबत त्यांनी प्रशासनासह संबंधितांना माहिती देण्याबाबत सांगितले. या घटनेबद्दल त्यांनी शोकही व्यक्त केला. सांगलीतील पूरस्थितीबाबत शासन, प्रशासन सर्व ते प्रयत्न ताकदीने करेल. जनतेला संकटातून बाहेर काढण्यात येईल, असा संदेश त्यांनी दिल्याचे देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस