लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेला ३१ मार्चअखेर ५ कोटी २ लाख रुपये विक्रमी ढोबळ नफा झाला आहे. आर्थिक वर्षात संस्थेने २७१ कोटींचा व्यवसाय केला आहे, अशी माहिती अध्यक्ष अजीज मुजावर यांनी दिली.
सुभाषचंद्र झंवर म्हणाले, संस्थेच्या १० शाखा कार्यरत असून, ३१ मार्चअखेर ठेवी १५३ कोटी, कर्जे ११८ कोटी, वसूल भागभांडवल ५ कोटी ३२ लाख, गुंतवणूक ६२ कोटी ५१ लाख, स्वनिधी २१ कोटी ३२ लाख आहे. संस्थेच्या १० शाखा कार्यरत आहेत. ऑडिट वर्ग सतत ‘अ’ आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र सांगली, कोल्हापूर जिल्हा आहे.
कोरोना संकट काळातही संस्था ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे.
अध्यक्ष अजीज मुजावर, उपाध्यक्ष दीपक साठे, सुभाषचंद्र झंवर, आर. आर. उंटवाल, धनपाल चौगुले, शिवाजीराव शिंदे, विठ्ठल तळवळकर, राजेंद्र मळणगावकर, भाऊसाहेब लोहार, राजाराम शेळके, अरविंद महाजन, अनुराधा झंवर, रंजना पाटील, गणपती जाधव, सर्जेराव तांबवेकर यांचे सहकार्य लाभले, असे मुख्य व्यवस्थापक एन. बी. काळोखे यांनी सांगितले.