शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

बलात्काराच्या घटना वाढल्या; लॉकडाऊन कालावधीत गुन्ह्यांमध्ये ४९ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 11:39 IST

लॉकडाऊनमध्ये गेल्यावर्षीपेक्षा बलात्काराच्या घटनांत वाढ झालेली आहे.गेल्यावर्षी मे महिन्यातही विविध प्रकारचे ६०० गुन्हे घडले होते. यंदा लॉकडाऊनमध्ये त्यातही घट झाली आहे. लॉकडाऊनच्या शिथीलतेमुळे गेल्या तीन महिन्यात सर्वाधिक गुन्हे मे महिन्यात घडले आहेत.

ठळक मुद्दे एप्रिल महिन्यात २३४ गुन्हे

शरद जाधव

सांगली : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व त्याचा प्रार्दूभाव वाढू नये यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये गुन्ह्यांच्या प्रमाणात मात्र कमालीची घट झाल्याचे चित्र दिसून आले. सध्या लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्याने गुन्हे पुन्हा वाढले असलेतरी गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात व या एप्रिलमधील गुन्ह्यांचा विचार करता ४९ टक्के गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. गेल्यावर्षी विविध प्रकारचे ४७८ गुन्हे घडले होते तर यंदा एप्रिलमध्ये २३४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शासनाने चार टप्प्यांमध्ये लॉकडाऊन घोषित केले होते. त्यातील पहिले दोन टप्पे अधिक काटेकोरपणे पाळण्यात आल्याने रस्त्यावर गर्दी तुरळक होती शिवाय सर्व व्यवहारही बंद होते. त्यामुळे या कालावधीत गुन्ह्यांचे प्रमाण घटल्याचे चित्र आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये गेल्यावर्षीपेक्षा बलात्काराच्या घटनांत वाढ झालेली आहे.गेल्यावर्षी मे महिन्यातही विविध प्रकारचे ६०० गुन्हे घडले होते. यंदा लॉकडाऊनमध्ये त्यातही घट झाली आहे. लॉकडाऊनच्या शिथीलतेमुळे गेल्या तीन महिन्यात सर्वाधिक गुन्हे मे महिन्यात घडले आहेत.

सायबर गुन्ह्यात वाढलॉकडाऊन कालावधीत कोरोनाविषयक अफवा पसरविणारे संदेश सोशल मिडियावर प्रसारीत करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली होती. सायबर सेलने याबाबत मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या होत्या. तरीही कोरोनाबाबत चूकीची व समाजात गैरसमज निर्माण होईल अशी माहितीची पोस्ट टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमध्ये १३ सायबरविषयक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुन्ह्यांचा प्रकार एप्रिल २०१९ एप्रिल २०२० घट/वाढ (टक्के)खून ३ ३ ०खूनाचा प्रयत्न २३ ४ -८३बलात्कार ६ ९ दिडपट वाढदरोडा ३ ० -१००जबरीचोरी १२ २ -८४घरफोडी २७ १६ -४१चोरी ९४ २९ -६९गर्दी करणे २६ २२ -१६अपहरण २५ ३ -८८फसवणूक १८ ४ -७८दुखापत ११२ ८१ -२८विनयभंग २१ १० -५३इतर गुन्ह्यांसहएकूण ४७८ २३४ -४९

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी