शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेतील बंद खात्यांचे ४९ कोटी रिझर्व्ह बँकेकडे जमा, १० वर्षे एकदाही उलाढाल नाही

By अशोक डोंबाळे | Updated: March 1, 2025 14:26 IST

'खातेदारांनी पुरावे दिल्यास पैसे मिळणार'

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेमधील गेल्या १० वर्षांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील २१७ शाखांमधील एक लाख ९१ हजारांवर खातेदारांची ४९ कोटी ४९ लाख २७ हजार रुपयांची रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा केली आहे. या खात्यातील रकमेत बँकेतील कर्मचाऱ्यांकडूनच गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्यामुळे जिल्हा बँकेच्या प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एखाद्या बँकेतील खात्यावर सलग १० वर्षे एकदाही उलाढाल झाली नसेल ते खाते नॉन-वर्किंग होते. त्या खात्यावर असलेली शिल्लक रिझर्व्ह बँकेला पाठवावी लागते. जिल्ह्यातील सर्व शाखांतील एक लाख ९१ हजार १३२ खातेदारांची ४९ कोटी ४९ लाख २७ हजार रुपये विविध कारणांनी बंद असलेल्या खात्यांमध्ये होती. ही रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्याबाबत जिल्हा बँकेला सूचना करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात ७५ हजार ७५९ खातेदारांचे २० कोटी ४५ लाख आठ हजार, तर दुसऱ्या टप्प्यात एक लाख १५ हजार ३७३ खातेदारांची २९ कोटी चार लाख १९ हजार रुपये इतकी रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करण्यात आली. बंद खातेदारांच्या वारसांनी आवश्यक पुरावे असलेली कागदपत्रे आणून त्या खात्यावरील रक्कम काढून देण्याबाबत बँकेने ग्राहकांना कळविले होते. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने खातेदारांची रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करावी लागली होती. संबंधित ग्राहकांनी कागदपत्रांची पूर्तता करून बंद खात्यातील रक्कम काढून घ्यावी, असे आवाहन जिल्हा बँकेतर्फे करण्यात आले.

खातेदारांनी पुरावे दिल्यास पैसे मिळतील : शिवाजीराव वाघरिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बंद खात्यातील खातेदारांचे पैसे रिझर्व्ह बँकेकडे जमा केले तरी ते संबंधित खातेदाराने अथवा त्यांच्या वारसांनी पुरावे दिल्यानंतर रक्कम परत मिळू शकते. ज्या बंद खात्यावरील पैसे गेले आहेत, त्या खातेदार आणि त्यांच्या वारसांनी आवश्यक कागदपत्रे जिल्हा बँकेला देण्याची गरज आहे. त्यानंतर त्यांची रक्कम संबंधित खातेदारांना दिली जाईल, अशी माहिती जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीbankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक