शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्याचा ४७२ कोटी रुपयांचा आराखडा शासनाकडे सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 18:25 IST

सीमावर्ती भागासाठी जादा निधी लागणार

सांगली : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत असलेला ४७२ कोटी ६६ लाख रुपयांचा आराखडा राज्यस्तरीय बैठकीत पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मांडला. यात १४  कोटी ८४ लाखांच्या अतिरिक्त मागणीचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या मागणीनुसार जास्तीत जास्त निधी दिला जाईल, असे आश्वासन  उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय बैठक झाली. यात दूरदृश्य प्रणालीद्वारे पालकमंत्री सहभागी झाले होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली आदी उपस्थित होते.दिलेल्या आराखड्यात बैठकीत १४० कोटी ८४ लाख रुपयांच्या अतिरिक्त मागणीचा समावेश असून, यामध्ये   शिक्षण विभाग ३३ कोटी, रस्ते व दळणवळण २९ कोटी, ग्रामीण विकास २१ कोटी ३४ लाख, आरोग्य १५ कोटी, उर्जा विभाग १२ कोटी, महिला व बालकल्याण ४ कोटी आणि इतर विभागांसाठी २६ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये वेळेत निधी खर्च करण्याच्या स्पष्ट सूचना खाडे यांनी दिल्या. यानंतर वाढीव निधीचीही मागणी करत तोही विकासकामांवर खर्च करण्यास सांगितले होते.पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार वाढीव निधीची मागणी करण्यात आली. रविवारी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत सादर केलेल्या आराखड्यात गाभाक्षेत्रासाठी १८६  कोटी १५ लाख २७ हजार, बिगर गाभा क्षेत्रासाठी ९३ कोटी सात लाख ६३ हजार, नावीन्यपूर्ण व मूल्यमापनासाठी १६ कोटी ५९ लाख १० हजार तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी ३६ कोटी अशी ३३१ कोटी ८२ लाखांची  तरतूद करण्यात आली आहे.येत्या मार्चपर्यंत सर्व वाढीव निधीही वापरण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर असणार आहे. त्यानुसार निधी खर्च करण्यासाठी आता केवळ दीड महिन्याचा कालावधी असणार आहे.सीमावर्ती भागासाठी जादा निधीमहाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील जत तालुक्यातील ४२ गावांमध्ये पायाभूत सोयी - सुविधा निर्माण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. यात  ग्रामपंचायत जनसुविधा, जिल्हा परिषद शाळांमध्ये सोयी सुविधा निर्माण करणे, विद्युत वितरणाची कामे, ग्रामीण रस्ते विकास, पाटबंधारे विभागाच्या कामांसाठी जादा निधी लागणार असल्याने यास मंजुरीची मागणी पालकमंत्री खाडे यांनी बैठकीमध्ये केली.

टॅग्स :Sangliसांगली