सांगली : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे ४७१ नवीन रुग्ण आढळले. परजिल्ह्यातील दोघांसह जिल्ह्यातील ८ अशा १० जणांचा मृत्यू झाला. ७३७ जण कोरोनामुक्त झाले, तर म्युकरमायकोसिसचा एक रुग्ण आढळला.
जिल्ह्यातील मृत्यूसंख्या रविवारी कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. ८ जणांचा मृत्यू झाला. त्यात तासगाव, मिरज तालुक्यातील प्रत्येकी २, खानापूर, पलूस, कवठेमहांकाळ व वाळवा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. अनेक महिन्यांनंतर महापालिका क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.
आराेग्य विभागाने आरटीपीसीआरअंतर्गत ५,०८४ जणांच्या नमुन्यांची चाचणी केली. त्यात ३०५ जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ५,९३० जणांच्या नमुने चाचणीतून १७० जण पॉझिटिव्ह आढळले.
उपचार घेत असलेल्या ४,६४२ जणांपैकी ६७१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५७० जण ऑक्सिजनवर, तर १०१ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील दोघांचा मृत्यू, तर नवीन ४ जण उपचारास दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १,८८,६७४
उपचार घेत असलेले ४,६४२
कोरोनामुक्त झालेले १,७९,०७०
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४,९६२
रविवारी दिवसभरात
सांगली ६८
मिरज १२
आटपाडी २०
कडेगाव ७४
खानापूर ७७
पलूस ३८
तासगाव ५७
जत २२
कवठेमहांकाळ १४
मिरज तालुका ३९
शिराळा ९
वाळवा ४१