शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा नियोजनच्या ४७१ कोटींच्या आराखड्यास मंजुरी

By अशोक डोंबाळे | Updated: January 10, 2024 18:22 IST

दीडशे कोटीची जादा मागणी : शिक्षण, आरोग्य, महावितरणसाठी निधीचा टक्का वाढविला

सांगली : शिक्षण, आरोग्य आणि महावितरणसाठी मूलभूत सुविधा वाढविण्यासाठी जिल्हा नियोजनसाठी १५० कोटी रुपयांचा जादा निधी शासनाकडे मागण्याचा निर्णय घेण्यात आला. २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा ४७१ कोटी १ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास बुधवारी जिल्हा नियोजनच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनची बैठक झाली. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार अरुण लाड, गोपीचंद पडळकर, अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, सुमनताई पाटील, विश्वजीत कदम, विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर, महापालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील उपस्थित होते.सुरेश खाडे म्हणाले, २०२३-२४ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून ४०५ कोटी रुपये निधी मंजूर आहे. त्यापैकी २८४ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, २१३ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. ४५ टक्के निधी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित कामांच्या प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही १५ दिवसांत पूर्ण करावी व मार्च २०२४ अखेर निधी खर्च करावा. याचे कटाक्षाने पालन करावे. कोणताही निधी परत जाणार नाही, याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी, असे आदेशही अधिकाऱ्यांना दिले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीPlanning Commissionनियोजन आयोग