शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील ४५८ अंगणवाड्या ‘आयएसओ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 11:36 IST

जिल्ह्यातील २४८४ अंगणवाड्या आणि ४४६ मिनी अंगणवाड्यांपैकी ४५८ अंगणवाड्यांना ‘आयएसओ’ (आंतरराष्ट्रीय मानांकन प्रमाण) मिळाले आहे.

ठळक मुद्देलोकसहभागातून सुमारे साडेचार कोटींचा निधी खर्च

अशोक डोंबाळे । सांगली : जिल्ह्यातील २४८४ अंगणवाड्या आणि ४४६ मिनी अंगणवाड्यांपैकी ४५८ अंगणवाड्यांना ‘आयएसओ’ (आंतरराष्ट्रीय मानांकन प्रमाण) मिळाले आहे. यासाठी लागणाºया मूलभूत सुविधांसाठी सुमारे साडेचार कोटींचा खर्च झाला असून, सेविका आणि

मदतनीसांनी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांकडून ही मदत जमविली आहे. कॉर्पोरेट शाळांना लाजवेल अशी अंगणवाडी शाळांची इमारत, अतिशय सुसज्ज, देखण्या बोलक्या भिंती आहेत. अनेक अंगणवाड्यांनी कात टाकून त्या डिजिटल झाल्या आहेत.जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडील अंगणवाड्यांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळू शकते, हे दाखविण्याचा सेविकांचा प्रयत्न सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून येथील अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी मूलभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. यासाठी त्यांना महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांनीही प्रोत्साहन दिले आहे.

जिल्ह्यातील २४८४ अंगणवाड्या आणि ४४६ मिनी अंगणवाड्यांपैकी ४५८ अंगणवाड्यांना आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ग्रामपंचायतींचे सहकार्य व गावपातळीवरील लोकसहभागातून अंगणवाड्यांना आयएसओ मिळाले असल्याचे सेविका सांगत आहेत. जिल्ह्यातील ४५८ अंगणवाड्यांमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी लोकसहभागातून सुमारे साडेचार कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे.या उपक्रमाचे पालकांमधूनही स्वागत होत आहे.  

सेविका, मदतनीसांच्या  कष्टामुळेच यशआयएसओ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सेविका आणि मदतनीसांनी प्रामाणिक लोकसहभागातून प्रयत्न केल्याचे हे यश आहे. शासकीय कोणताही निधी नसताना साडेचार ते पाच कोटींची कामे लोकसहभागातून केली आहेत, अशी प्रतिक्रिया महिला व बालकल्याण समिती सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद