शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जादा परताव्याचे आमिष: सांगलीत व्यावसायिकाची ४१ लाखांची फसवणूक

By शीतल पाटील | Updated: September 8, 2023 18:29 IST

दोघांवर गुन्हा दाखल

सांगली : जादा परताव्याचे आमिष दाखवून कवठेमहांकाळ तालुक्यातील कोंगनोळी येथील एका व्यावसायिकाची ४१ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदिप तुकाराम नवगिरे (रा. पिपळखुंटे, ता. माढा, जि. सोलापूर ) आणि पावबा रमण कोळी (रा. सह्याद्रीनगर, विश्रामबाग, सांगली ) अशी संशयीतांची  नावे आहेत.याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात जुन्या वाहनांची खरेदी विक्री करणारे व्यावसायिक सचिन तमन्ना रामगोंडावरु यांनी फिर्याद दिली आहे. फसवणूकीचा प्रकार १५ सप्टेंबर २०२१ ते २१ ऑक्टोबर २०२१ रोजी घडला.  दोघा संशयीतांनी रामगोंडावरु यास सांगलीतील आमराई परिसरात बोलवून घेतले. तेथे संशयीत संदिप नवगिरे याने ॲक्सीस ग्रो एल एल पी या शेअर मार्केटमध्ये ट्रेंडिग करणाऱ्या फर्ममध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळत असल्याचे सांगितले. कमी कालावधीत चांगला अर्थिक फायदा होत असल्याचे पाहून फिर्यादी यांनी सदर कंपनीत पैसे गुंतविण्यास संमती दर्शवली.दरम्यान फिर्यादी रामगोंडावरु यांनी संशयीतांनी सांगितल्यानुसार अकलूज येथील ॲक्सीस बॅँकेच्या शाखेतील संबंधित खात्यात एक कोटी रक्कम गुंतविली. काही दिवसांनी संशयीतांनी फिर्यादीस कंपनीच्या करंट तसेच स्वत:च्या सेव्हिंग खात्यावरुन फिर्यादीच्या सांगली येथील बॅँक खात्यावर ५८ लाख ९५ हजार रुपये वर्ग केले. मात्र त्यानंतर कोणतीच रक्कम फिर्यादीस परत मिळाली नाही. याप्रकरणी फिर्यादी रामगोंडावरु यांनी वारंवार संशयीतांकडे पाठपुरावा केला. विश्वास संपादन करण्यासाठी संशयीतांनी फिर्यादीस कोरे धनादेश दिले. परंतु त्यानंतरही रक्कम परत दिली नाही. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी रामगोंडावरु यांनी दोघा संशयीतांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी