शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

शासकीय दप्तरी सांगली जिल्ह्यात ११२ टक्के पाऊस : दुष्काळी भाग कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:25 IST

जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दि. १ जून ते १५ आॅगस्ट या कालावधित बऱ्यापैकी पाऊस होतो. शिराळा, वाळवा पट्यात तर याच कालावधित धो धो पाऊस कोसळत असतो. यावर्षीचे चित्र पूर्णत: वेगळे आहे.

ठळक मुद्देखानापूर तालुक्यात खरीप पेरण्या थांबल्या

सांगली : मान्सूनपूर्व आणि मान्सूनचा असा दोन्ही पाऊस जिल्ह्यात बरसलाच नसल्यामुळे जिल्ह्यात तलाव आणि विहिरी कोरड्या ठणठणीत आहेत. तरीही शासनाच्या पर्जन्यमान यंत्रावर मात्र जिल्ह्यात दि. १ जून ते २६ जुलैपर्यंत सरासरी ११२ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. गंमत म्हणजे दुष्काळी भागामध्ये सध्या २५० च्यावर टँकर चालू असताना दुष्काळी तालुक्यात सरासरी १०० टक्केहून जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे. एवढा पाऊस असतानाही खरीप पेरणीच्या पिकांनी मात्र माना टाकल्याचे दुष्काळी तालुक्यातील चित्र आहे.

जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दि. १ जून ते १५ आॅगस्ट या कालावधित बऱ्यापैकी पाऊस होतो. शिराळा, वाळवा पट्यात तर याच कालावधित धो धो पाऊस कोसळत असतो. यावर्षीचे चित्र पूर्णत: वेगळे असल्याचे दिसत आहे. दरवर्षी साधारणपणे दि. २६ जुलैपर्यंत चांदोली धरण शंभर टक्के भरलेले असते. यावर्षी पावसाळा संपण्यास वीस दिवसांचा कालावधी शिल्लक असताना चांदोली धरण केवळ ६० ते ६५ टक्केच भरलेले आहे. जत, आटपाडी, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, कडेगाव तालुक्यांसह मिरज पूर्व भागातील तलाव आणि विहिरी सध्या कोरड्या ठणठणीत आहेत. दि. १ जून ते २६ जुलैपर्यंत गेल्यावर्षी १२५.६ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यावर्षी १३.६ मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे, असे शासकीय आकडेवारीवरुन दिसत आहे.

दि. १ जून ते २६ जुलै २०१९ यावर्षी मिरज तालुक्यात १४१ टक्के, जत १२५ टक्के, वाळवा ९३ टक्के, तासगाव १११ टक्के, शिराळा १०० टक्के, आटपाडी १२३ टक्के, कवठेमहांकाळ १५९ टक्के, पलूस ८५ टक्के, कडेगाव ११५ टक्के आणि सर्वात कमी खानापूर तालुक्यात ७० टक्के पाऊस झाल्याची नोंद पाटबंधारे विभाग आणि महसूल विभागाकडील पर्जन्यमापकावर झाली आहे. प्रत्यक्षात दुष्काळी भागाकडे पाहिल्यानंतर मात्र पावसाच्या आकडेवारीबद्दल शेतकऱ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. पाऊस पडला तर त्याचे पाणी कुठे गेले, असा सवालही शेतकरी उपस्थित करत आहे. कारण, आजही दुष्काळी भागातील तलाव कोरडे असून विहिरी आणि विंधन विहिरींनी तळ गाठला आहे. खरिपाची पेरणी जिल्ह्यात जवळपास ९० टक्केहून जास्त झाली आहे. परंतु, पुरेशा प्रमाणात पाऊस नसल्यामुळे खरिपाची कोवळी पिके कोमेजू लागली आहेत.

चांदोली धरण : परिसरात पाऊसवारणावती : चांदोली धरण परिसरात पावसाने दीड हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला, तर धरण ६५ टक्के भरले आहे. मुसळधार पाऊस सुरूच आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. शुक्रवारी दिवसभर पावसाने जोर वाढवला होता. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाच हजार २५१ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या २४ तासात ५२ मिलिमीटर पावसासह एकूण एक हजार ५१८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाण्याची पातळी ६१३.२५ मीटर झाली असून पाणीसाठा २२.३६ टीएमसी झाला आहे. त्याची टक्केवारी ६५ आहे. सध्या मुसळधार पाऊस सुरूच आहे. वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे.

जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाची हजेरीसांगली, मिरज शहरास जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने दिवसभर हजेरी लावली होती. रिमझिम सरी येत असल्यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली होती. शिराळा, वाळवा तालुक्यासह दुष्काळी काही गावांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक गावांना पावसाने हुलकावणीच दिल्यामुळे दिली आहे. खरीप हंगाम वाया जाणार की काय, अशा चिंतेत शेतकरी सध्या दिसत आहे.