शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणीतील सेनानींना महिन्याला ३.७५ लाख रुपये, सांगली जिल्ह्यात ४८ लाभार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 14:30 IST

भाजप सरकारची मानधन योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केली होती.

सांगली : आणीबाणीत कारावास भोगलेल्या जिल्ह्यातील ४८ लोकतंत्र सेनानींना मानधन दिले जात आहे. महिन्याकाठी एकूण ३ लाख ७५ हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. महाविकास आघाडी सरकारने बंद केलेल्या कालावधीची थकबाकीही मंजूर झाली आहे.सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत लढा दिलेल्या व्यक्तींच्या गौरवासाठी योजना सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारने ३१ जुलै २०२० रोजी बंद केली होती. ऑगस्ट २०२२ पासून पुन्हा नव्याने सुरू झाली. आणीबाणीमध्ये एका महिन्यासपेक्षा जास्त कारावास भोगलेल्यांना मासिक १० हजार रुपये, त्यांच्या पश्चात लाभार्थ्याला पाच हजार रुपये मानधन देण्यात येत आहे.

एका महिन्यापेक्षा कमी कारावासासाठी मासिक पाच हजार रुपये, तर त्यांच्या पश्चात लाभार्थ्याला २ हजार ५०० रुपये देण्यात येतात. जिल्ह्यात २७ जणांना प्रत्येकी १० हजार, १९ जणांना पाच हजार आणि दोन विधवांना प्रत्येकी पाच हजार रुपये दिले जात आहेत. यातील बहुतांश सांगली, मिरजेचे रहिवासी असून, दोघे जतमधील आहेत.

१९ जण विशीच्या आतीललाभार्थ्यांपैकी १९ जण आणीबाणीच्या काळात १९ वर्षांपेक्षी कमी वयाचे होते. सातजण तर १७ वर्षांचे आणि तिघे १६ वर्षांचे होते. अल्पवयीन काळात कारावास भोगल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे.

कायदा करण्याची मागणीभाजप सरकारची मानधन योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केली होती. सरकार बदलल्यावर योजना पुन्हा बंद होऊ नये यासाठी विधानसभेत मानधनाचा कायदाच करण्याची मागणी लोकतंत्र सेनानी संघाने केली आहे. संघाचे सचिव श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, मध्य प्रदेश सरकारने कायदा करून महिन्याला २५ हजार रुपये मानधन सुरू केले आहे. तसाच लाभ महाराष्ट्रातही द्यावा. मुख्यमंत्री व उपुख्यमंत्र्यांच्या सही-शिक्क्याचे ओळखपत्र द्यावे. मध्य प्रदेशच्या सर्व योजनांचा लाभ देऊन लोकतंत्र सेनानींचे शुभाशीर्वाद घ्यावेत.

टॅग्स :Sangliसांगली