शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

जिल्ह्यात शासकीय व खाजगी 27 रूग्णालयात 375 आयसीयु तर 1235 वॉर्ड बेडस् उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 12:32 IST

कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये आजअखेर कोविड रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय व खाजगी अशी एकुण 27 रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणुन अधिग्रहीत करण्यात आली असून यामध्ये कोविड रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देशासकीय व खाजगी 27 रूग्णालयात 375 आयसीयु तर 1235 वॉर्ड बेडस् उपलब्धआणखी 14 खाजगी रूग्णालये अधिग्रहीत : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये आजअखेर कोविड रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय व खाजगी अशी एकुण 27 रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणुन अधिग्रहीत करण्यात आली असून यामध्ये कोविड रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

या सर्व रुग्णालयांमध्ये 375 आयसीयु बेडस् व 1 हजार 235 वॉर्ड बेडस, असे एकुण 1 हजार 610 बेडस् उपलब्ध करण्यात आलेले आहेत. यापैकी 14 रुग्णालये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीत असुन 13 रुग्णालये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये आहेत. या व्यतिरिक्त आणखी 14 खाजगी रूग्णालये कोविड रूग्णालये म्हणून अधिग्रहीत करण्यात आली आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोविड रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय व खाजगी अशी एकुण 27 रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणुन अधिग्रहीत करण्यात आली आहेत. याव्यतिरीक्त डॉ. दिपक शिखरे, लाईफ केअर हॉस्पिटल कोल्हापुर रोड, डॉ. गोविंद कुलकर्णी यांचे जीएसके फ्रॅक्चर ॲन्ड ऑर्थोपेडीक हॉस्पिटल मिरज, डॉ.रविंद्र वाळवेकर यांचे हॉस्पिटल (भगवान महावीर कोविड सेंटर), डॉ.आशिष मगदुम यांचे क्रांती हॉस्पिटल ही सांगली व मिरज शहरातील हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल्स म्हणून अधिग्रहीत करण्यात आलेली आहेत.इस्लामपुर तालुक्यातील डॉ. कबाडे यांचे स्पंदन हॉस्पिटल आष्टा, आष्टा क्रिटीकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आष्टा, डॉ. शहा यांचे सुश्रुषा हॉस्पिटल इस्लामपुर, डॉ.वाठारकर यांचे आधार हॉस्पिटल इस्लामपुर, डॉ.सांगरुळकर यांचे साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, विटा तालुक्यातील डॉ. वारे यांचे श्री हॉस्पिटल विटा, तासगाव तालुक्यातील डॉ. जाधव यांचे हॉस्पिटल, डॉ. शिंदे यांचे श्री हॉस्पिटल, जत तालुक्यातील डॉ.आरळी यांचे उमा चॅरीटेबल हॉस्पिटल / शांताबाई आरळी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ.पट्टणशेट्टी यांचे मयुरेश्‍वर हॉस्पिटल ही हॉस्पिटल डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणुन अधिग्रहीत करण्यात आलेली आहेत.नागरिकांना या सर्व खाजगी व शासकीय अधिग्रहीत कोविड रुग्णालयांमध्ये असलेल्या एकुण बेडपैकी रिक्त असलेले आयसीयु बेडस व वॉर्ड बेडस ची माहिती तात्काळ व सहजरित्या उपलब्ध व्हावी म्हणुन संगणकीकृत बेड इन्फॉरमेशन सिस्टिम विकसित करण्यात आलेली असुन या सिस्टिमवर दाखल होत असलेले रुग्ण व रुग्णालयांतुन डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण यांची माहिती रुग्णालयांकडुन रिअल टाईम अद्ययावत करण्यात येते.

रुग्णांना उपलब्ध बेडविषयी तात्काळ माहिती उपलब्ध करुन देण्याकरीता, जिल्हा परिषद व महानगरपालिका येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले असुन ते 24७7 कार्यरत आहेत. जिल्हा परिषद नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 0233-2374900, 0233-2375900, 0233-2377900, 0233-2378900 आहे. नियंत्रण कक्षाकडे संपर्क करणारे रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना बेड उपलब्धतेविषयी माहिती दिली जात असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, रुग्णालयांकडुन माहिती अद्ययावत करुन घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनन प्रत्येक रुग्णालयासाठी 24७7 असे एकुण 30 प्रशासकीय अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. सदर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल होण्यासाठी येत असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी सर्वोतोपरी मदत करावयाची आहे.

रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांंची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयामध्ये उपचाराखाली असलेल्या रुग्णांची योग्य व अद्ययावत माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना मिळावी म्हणून प्रत्येक रुग्णालयामध्ये मदत कक्ष स्थापन करणेत आलेले असुन या मदत कक्षामार्फत रुग्णांच्या नातेवाईकांना मोबाईलव्दारे माहिती दिली जाते.रुग्णांना आकारण्यात येणाऱ्या बिलांच्या तपासणीसाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि जिल्हा कोषागार अधिकारी यांच्या अधिपत्याखाली प्रत्येक रुग्णालयांसाठी लेखा परिक्षण अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली असून रुग्णांना डिस्चार्ज देण्यापूर्वी रुग्णालयाकडून आकारण्यात आलेल्या बिलांची तपासणी करण्यात येत आहे.

जिल्हास्तरावर याबाबत शहरी भागासाठी 01 व ग्रामीण भागासाठी उपविभागनिहाय प्रत्येकी 01 भरारी पथक गठीत करण्यात आलेले असुन त्यांच्यामार्फत अचानक रुग्णालयांना भेटी देवून महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि रुग्णालयांकडून आकारण्यात येत असलेल्या बिलांबाबत तपासण्या करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.दाखल रुग्णांपैकी वैद्याकिय तपासणीअंती ज्या रुग्णांना डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये सक्रीय उपचारांची गरज नाही व जे रुग्ण डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर मध्ये ऑक्सिजन सुविधायुक्त बेडसवर अथवा कोविड केअर सेंटर मध्ये उपचाराखाली राहू शकतात किंवा जे रुग्ण गृह विलगीकरणामध्ये राहू शकतात याबाबतचा आढावा घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नियंत्रणाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या एकुण 04 पर्यवेक्षणीय समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत.

उपचाराधिन व उपचाराअंती डिस्चार्ज देण्यास योग्य असलेल्या रुग्णांची माहिती घेवून डिस्चार्ज पॉलिसीची अंमलबजावणी योग्यरित्या होते किंवा कसे याबाबत या तपासणी पथकांमार्फत तपासणी करण्यात येत आहे.सर्व कोविड रुग्णालयांसाठी ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणी संपर्क साधणे आणि वेळेवर, जलद व पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध करुन देणे यासाठी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, प्र. सहायक आयुक्त औषधे (अन्न व औषध प्रशासन), प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी यांचे पथक गठीत करण्यात आलेले आहे. 

नेमण्यात आलेल्या सर्व शासकीय प्रशासकीय अधिकारी, लेखाधिकारी, तपासणी पथके व रुग्णालयांचे कर्मचारी या सर्वांचे याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत प्रशिक्षण घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी