शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! तुफान गर्दी, प्रचंड उत्साह, वरळी डोममध्ये काय घडतंय?
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
4
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
5
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
6
"मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
7
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
8
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
9
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला भक्तिरंगात न्हाऊन निघा; प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!
10
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
11
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
12
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
13
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
14
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
15
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
16
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
17
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
18
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
19
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
20
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!

सांगलीत नियोजन समितीअभावी ३७० कोटींच्या कामांचा झाला त्रिशंकू, पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची प्रतीक्षा

By संतोष भिसे | Updated: September 15, 2022 18:33 IST

शिंदे सरकारने पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या अद्याप जाहीर केलेल्या नाहीत, त्यामुळे समितीच्या बैठकाही झालेल्या नाहीत.

सांगली : जिल्ह्याचा पालकमंत्री अद्याप ठरलेला नसल्याने नियोजन समितीच्या कामांनीही ब्रेक लागला आहे. सुमारे ३७० कोटींची कामे ठप्प असून प्रशासनाच्याही नजरा पालकमंत्र्यांच्या नियुक्तीकडे लागल्या आहेत.२९ जूनरोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर नियोजन समिती निर्णयक्षम राहिली नाही. समितीच्या बैठका पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होतात. शिंदे सरकारने पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या अद्याप जाहीर केलेल्या नाहीत, त्यामुळे समितीच्या बैठकाही झालेल्या नाहीत. सामान्यत: प्रत्येक तीन महिन्यांनी समितीच्या बैठका होतात. जिल्ह्याची यापूर्वीची बैठक जूनमध्ये झाली होती. त्यामध्ये विकासकामांच्या आराखड्यांना मंजुऱ्या मिळाल्या, पण शिंदे सरकारने त्यांनाही स्थिगिती दिली. त्यामुळे मार्चपूर्वी झालेल्या बैठकीतील कामेच अद्याप सुरु आहेत.याचा मोठा फटका स्मार्ट पीएचसी आणि मॉडेल स्कूल मोहिमेला बसला आहे. या दोन्ही उपक्रमांत जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. पण निधीअभावी शाळांच्या दुरुस्त्या थांबल्या आहेत. काही शाळांच्या अर्धवट दुरुस्त्यांना निधीची चणचण भासू लागली आहे. स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजनेची अवस्थाही अशीच आहे. `क` वर्गातून विकासकामे मंजूर झालेल्या तीर्थक्षेत्रांचे रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, सभामंडप व भक्तनिवास अशी कामे नव्याने मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. एकट्या शिराळा तालुक्यात ९० कोटींची कामे थांबल्याची माहिती आहे.मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांना कामगारमंत्रीपद मिळाल्याने पालकमंत्रीपदाची माळही त्यांच्याच गळ्यात पडण्याची शक्यता आहे, पण तसा निर्णय अद्याप झालेला नसल्याने नियोजन समितीतही शांतता आहे.ही कामे थांबलीमॉडेल स्कूल, स्मार्ट पीएचसी, क वर्ग तीर्थक्षेत्रातील विकासकामे, जनसुविधा, नागरी सुविधा, रस्ते, शौचालये युनिट, भूमीगत गटारी आदी योजनांची कामे निधीअभावी खोळंबली आहेत.गुवाहाटीच्या धांदलील नियोजनच्या बैठकासरकार कोसळण्याच्या सुमारास चाळीसभर आमदार गुवाहाटीला जाऊन बसले. सत्ताधारी मंत्री व आमदारांना सरकार कोसळण्याची चुणूक लागताच जून महिन्यात सर्वच जिल्ह्यांत नियोजन समित्यांच्या बैठकांची घाईगडबड करण्यात आली. कामांचे आराखडे निश्चित करुन निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली. पण कार्यारंभ आदेश निघण्यापूर्वीच सरकार कोसळले, आणि नियोजन समितीच्या कामांचा त्रिशंकू झाला.

टॅग्स :Sangliसांगली