शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

जिल्ह्यात शिधापत्रिका अद्यावतीकरणासाठी 36 हजार 223 प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 16:03 IST

सांगली जिल्ह्यात शिधापत्रिका अद्यावतीकरण मोहिम 10 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी पर्यंत राबविण्यात आली या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदारांकडून 36 हजार 223 शिधापत्रिकांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते त्यापैकी 9 हजार 710 शिधापत्रिका तयार झाल्या असून यातील 2 हजार 772 शिधापत्रिकांचे वाटप नागरिकांना समाधान मेळाव्यामध्ये करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात शिधापत्रिका अद्यावतीकरणासाठी 36 हजार 223 प्रस्तावसर्वस्तरातील नागरिकांकडून मोहिमेचे कौतुक

सांगली : सांगली जिल्ह्यात शिधापत्रिका अद्यावतीकरण मोहिम 10 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी पर्यंत राबविण्यात आली या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदारांकडून 36 हजार 223 शिधापत्रिकांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते त्यापैकी 9 हजार 710 शिधापत्रिका तयार झाल्या असून यातील 2 हजार 772 शिधापत्रिकांचे वाटप नागरिकांना समाधान मेळाव्यामध्ये करण्यात आले आहे.पालकमंत्री जयंत पाटील, अन्न व नागरीपुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यात 10 ते 20 फेब्रुवारी व वाढीव टप्प्यात 21 ते 29 फेब्रुवारी या कालावधीत राबविणत आलेल्या शिधापत्रिका अद्यावतीकरण मोहिमे अंतर्गत केशरी दुबार शिधापत्रिका 23 हजार 859, पिवळे दुबार 5 हजार 417, शुभ्र दुबार 266 अशा एकूण 29 हजार 542 शिधापत्रिका व नविन केशरी शिधापत्रिका 6 हजार 578, शुभ्र नविन 103 एकूण 6 हजार 181 शिधापत्रिका तयार करण्याचे काम तालुकास्तरावर गतीने सुरु आहे. या मोहिमेमुळे नागरिकांचा वेळ, पैसा, श्रम यामध्ये बचत झाल्याने सर्वस्तरावरुन पुरवठा विभाग व जिल्हा प्रशासन यांचे कौतुक करण्यात येत आहे.या शिधापत्रिका अद्यावतीकरण विशेष मोहिमेसाठी जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानदार, सर्व तहसिलदार, त्यांचे अधिनस्त अधिकारी/कर्मचारी, अन्न धान्य वितरण अधिकारी व त्यांचे अधिनस्त कर्मचारी, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, त्यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी नियमित कामकज साबांळून या मोहिमेत सहभाग घेतला व मोहिम यशस्वी केली. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला याबद्दल प्रशासनाकडून नागरिकांचेही आभार व्यक्‍त करण्यात येत आहे.शिधापत्रिकांसाठी आवश्यक कागदपत्रांसह जमा झालेल्या प्रस्तावांची संख्या तालुका निहाय पुढीलप्रमाणे आटपाडी झ्र 2335 यातील केशरी दुबार 1137, विभक्त अथवा नविन 189, पिवळी दुबार 973, शुभ्र दुबार 36, जत झ्र 3116 यातील केशरी दुबार 1778, विभक्त अथवा नविन 1191, पिवळी दुबार 136, शुभ्र विभक्त/नविन 11, कडेगाव झ्र 1921 यातील केशरी दुबार 1375, विभक्त अथवा नविन 318, पिवळी दुबार 206, शुभ्र दुबार 20, विभक्त नविन 2, कवठेमहाकाळ झ्र 2222 यातील केशरी दुबार 1330, विभक्त अथवा नविन 286, पिवळी दुबार 181, शुभ्र दुबार 20, विभक्त/नविन 5, खानापूर झ्र 2096 यातील केशरी दुबार 1485, विभक्त अथवा नविन 185, पिवळी दुबार 422, शुभ्र दुबार 4, मिरज झ्र 2402 यातील केशरी दुबार 1571, विभक्त अथवा नविन 306, पिवळी दुबार 499, शुभ्र दुबार 26, पलूस झ्र 2811 यातील केशरी दुबार 1460, विभक्त अथवा नविन 1320, पिवळी दुबार 27, शुभ्र दुबार 3, विभक्त/नविन 1, सांगलीझ्र 5279 यातील केशरी दुबार 2940, विभक्त अथवा नविन 501, पिवळी दुबार 1759, शुभ्र दुबार 51, विभक्त/नविन 28, शिराळा झ्र 2514 यातील केशरी दुबार 1175, विभक्त अथवा नविन 603, पिवळी दुबार 717, शुभ्र दुबार 09, विभक्त/नविन 10, तासगाव झ्र 7407 यातील केशरी दुबार 6060, विभक्त अथवा नविन 1050, पिवळी दुबार 262, शुभ्र दुबार 30, विभक्त/नविन 5, वाळवा झ्र 4120 यातील केशरी दुबार 3148, विभक्त अथवा नविन 629, पिवळी दुबार 235, शुभ्र दुबार 67, विभक्त/नविन 41, असे एकूण जिल्ह्यातून 36,223 अर्ज प्राप्त झाले असून यातील केशरी दुबार 23859, विभक्त अथवा नविन 6578, पिवळी दुबार 5417, शुभ्र दुबार 266, विभक्त/नविन 103 अर्ज प्राप्त झाले आहेत.

 आवश्यक कागदपत्रे दुकानदारांकडे जमा केल्यावर कुठेही हेलपाटे मारावे न लागता घरपोच नवीन रेशनकार्ड मिळाले याचा खूप आनंद आहे.उषा भरत शिंदे,रा. सावळी ता .मिरज

20 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड होते, ते जिर्ण होऊन खराब झाल्याने त्यावर तपशिल लिहायलाही अडचण होत होती. रेशन दुकानदारांनी या मोहिमेची माहिती दिली. त्याप्रमाणे कागदपत्रे गोळा केली. शासकीय शुल्क आकारून त्याची पावती दिली. कार्ड तयार करून घरपोच केले. त्या बद्दल मी शासनाचा आभारी आहे. आनंदा ज्ञानू कांबळे .

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली