शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

कडेगाव तालुक्यातील ३५ गावे सिटी सर्व्हेविना : नागरिकांना करावा लागतोय अडचणींचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:08 IST

देवराष्ट्रे : स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी अनेक गावांतील गावठाण हद्दीचे नकाशे तयार केले, तेच नकाशे आजही आहेत; पण त्याच नकाशावरून गावातील वैयक्तिक हद्दी कायम करून त्यांची नोंद शासकीय दप्तरी होणे

अतुल जाधव ।देवराष्ट्रे : स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी अनेक गावांतील गावठाण हद्दीचे नकाशे तयार केले, तेच नकाशे आजही आहेत; पण त्याच नकाशावरून गावातील वैयक्तिक हद्दी कायम करून त्यांची नोंद शासकीय दप्तरी होणे गरजेचे असताना, शासनाच्या दिरंगाईने गेल्या ७० वर्षांत या नोंदी शासनाने न केल्यामुळे गावठाणमधील हद्दी वादावादीचे विषय ठरत आहेत. कडेगाव तालुक्यातील ३५ गावांचा गेल्या ७० वर्षांत सिटी सर्व्हे झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कडेगाव तालुका निर्माण होऊन १५ वर्षे झाली; पण अजून राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे व अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे तालुक्यातील विविध विषय बाजूला पडले आहेत. सिटी सर्व्हे होणे हा ग्रामीण भागातील अत्यंत गरजेचा विषय असतानाही, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. तालुक्यात ३५ गावांतील जवळजवळ हजारो घरे व खुल्या जागांची शासनदरबारी नोंद नाही. या गावठाणमधील जागेचे नकाशेही शासनाने तयार केलेले नाहीत. त्यामुळे गावात कोणाची कोणती जागा आहे, यावरून गावा-गावात भांडणे व वादविवाद चालू असतात. ग्रामीण भागातील सर्वात जास्त तक्रारी या जागेवरून चालू असतात. या जागेचा सिटी सर्व्हे झाल्यास बरेच वाद कोर्टात न जाता मिटतील.

सत्तरच्या दशकात तालुक्यातील ५५ गावांपैकी फक्त १९ गावांचा सिटी सर्व्हे झाला. यामध्ये कडेगाव, कडेपूर, शाळगाव, विहापूर, अमरापूर, वडियेरायबाग, हिंगणगाव (बु), तोंडोली, येतगाव, नेवरी, शिवणी, देवराष्ट्रे, चिंचणी, मोहिते वडगाव, अंबक, रामापूर, वांगी, तडसर, हिंगणगाव खुर्द, तर उर्वरित ३५ गावे अजूनही सिटी सर्व्हेपासून वंचित आहेत. उर्वरित गावांचा सिटी सर्व्हे करण्यास शासनाने अद्याप हालचाल केलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.सर्व्हे नाही, कर्ज नाहीगावातील गावठाण जागेचा सिटी सर्व्हे झालेला नाही, नकाशा नाही, अशा कोणत्याही मालमत्तेवर बँक कर्ज देत नाही. सिटी सर्व्हे न झालेल्या जागेवर कर्ज मिळाले तर त्याचा बोजा संबंधित जागेवर चढविण्यास शासनाने ग्रामपंचायतींना मज्जाव केला आहे.उतारे फक्त करासाठी!गावठाणमधील मालमत्तेवर बँकांकडून कर्ज घेतल्यास त्याचा बोजा सिटी सर्व्हे उताºयावर चढविणे बंधनकारक आहे. याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये करणे ग्राह्य नाही. ग्रामपंचायत उतारे हे कर गोळा करण्यासाठीचे आहेत, असा आदेश शासनाने काढल्यामुळे नागरिकांची कोंडी झाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकार