शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

‘जलयुक्त’च्या कामांसाठी कृषी विभाग घेतोय ३५ टक्के कमिशन

By admin | Updated: March 7, 2017 22:30 IST

जयकुमार गोरे : अधिकारीच म्हणे पैसे मंत्रालयापर्यंत द्यावे लागतात

खटाव : ‘जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या आणि सुरू असलेल्या कामांची फुगवलेली आकडेवारी अधिकारी शासनाकडे सादर करत आहेत. कामांचे कार्यालयात फक्त कागदावरच नियोजन केले जाते. कामे मात्र, त्या प्रमाणात होत नाहीत. कृषी विभाग जलयुक्त शिवारमधील कामांसाठी ३५ टक्के कमिशन घेत आहे. अधिकारीच हे पैसे मंत्रालयापर्यंत द्यावे लागतात. असे उघडपणे सांगतात,’ असा गौप्यस्फोट आमदार जयकुमार गोरे यांनी केला.अर्थसंकल्पीय अधिवेशनात जलयुक्त शिवार प्रस्ताव २९३ वर चर्चा करताना त्यांनी या योजनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. आमदार गोरे म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना साखळी सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांना गती मिळाली होती. माझ्या मतदार संघातील माण-खटाव तालुक्यांमधील या कामांचा चांगला परिणाम संपूर्ण राज्याने साडेचार वर्षांपूर्वी पाहिला होता. सध्याच्या सरकारने अलीकडच्या काळात ‘जलयुक्त शिवार’ ही योजना सुरू केली आहे. आमच्याकडे अगोदरपासूनच जलसंधारणाची अशी कामे झाली आहेत.या सरकारने जलयुक्त शिवार अंतर्गत होणाऱ्या कामांना मोठा निधी देण्याची घोषणा केली. तसा ठरावही केला. मात्र, प्रत्येक तालुक्याला प्रत्यक्षात किती निधी मिळाला. लोकसहभागातून किती निधी जमा झाला हे पाहणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षांत माझ्या तालुक्यात फक्त तीन-साडेतीन कोटींचा निधी मिळाला. दोन वर्षांत इतक्या निधीतून ७४ गावांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यात आली.’ आ. गोरे म्हणाले, ‘जलयुक्त शिवार ही योजना शासन अधिकाऱ्यांमार्फत राबवत आहे. हेच अधिकारी या योजनेचा आराखडा कार्यालयात बसून कागदावर तयार करतात. प्रत्यक्षात साईट पाहिल्या जात नाहीत. स्थानिक स्तर विभागाकडून बंधाऱ्याच्या निवडलेल्या साईटस् चुकीच्या असतात. त्याचे बजेटही चुकीचे असते. (प्रतिनिधी)