बागणी : बागणी (ता. वाळवा) प्राथमिक केंद्रांतर्गत येणाऱ्या नऊ गावांमधील कोरोना रुग्णवाढीचा दर चिंताजनक बनला आहे. रुग्णसंख्या ३४८ असून त्यापैकी १६२ सक्रिय रुग्ण आहेत. १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बागणी प्राथमिक केंद्राअंतर्गत बागणी, रोझावाडी, फाळकेवाडी, काकाचीवाडी, शिगाव, कोरेगाव, भडकंबे, ढवळी, फार्णेवाडी या गावांचा समावेश होतो. तेथील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. गावानुसार रुग्ण असे : बागणी : ४१ रुग्ण, २० बरे, ३ मृत्यू व १८ सक्रिय रुग्ण, रोझावाडी : ४ रुग्ण व ४ सक्रिय रुग्ण, फाळकेवाडी : १६ रुग्ण, ५ बरे व ११ सक्रिय रुग्ण, काकाचीवाडी : ५२ रुग्ण, २५ बरे, ५ मृत्यू व २२ सक्रिय रुग्ण, शिगाव : ७७ रुग्ण, ३६ बरे, ३ मृत्यू व ३८ सक्रिय रुग्ण, कोरेगाव : ३१ रुग्ण, २१ बरे व १० सक्रिय रुग्ण, भडकंबे : ३५ रुग्ण, ३० बरे व ५ सक्रिय रुग्ण, ढवळी : ८९ रुग्ण, ३६ बरे, २ मृत्यू व ५१ सक्रिय रुग्ण, फार्णेवाडी : ३ रुग्ण व ३ सक्रिय रुग्ण. एकूण रुग्णसंख्या ३४८ असून त्यापैकी १६२ सक्रिय रुग्ण आहेत. १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.