शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वारणा धरणात 34.02 तर कोयना धरणामध्ये 103.20 टी.एम.सी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 14:47 IST

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पर्यंत 34.02 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

ठळक मुद्देवारणा धरणात 34.02 तर कोयना धरणामध्ये 103.20 टी.एम.सी पाणीसाठा जिल्ह्यात सरासरी 2.70 मि. मी. पावसाची नोंद

सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पर्यंत 34.02 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.दिनांक 10 सप्टेंबर रोजीच्या सकाळी 8 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 103.20 टी.एम.सी. इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, आहे. धोम धरणात 13.27 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 9.98 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 24.79 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.28 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 96.30 टीएमसी पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. आहे, असे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 9 हजार 943 क्युसेक्स तर कोयना धरणातून 20 हजार 34 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून 2 लाख 13 हजार 491 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. आयर्विन पुल सांगली येथे 32 फूट 7 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 45 फूट) तर अंकली पुल हरिपूर येथे 38 फूट 3 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 50 फूट 3 इंच).जिल्ह्यात सरासरी 2.70 मि. मी. पावसाची नोंदजिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 2.70 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.कालपासून आज सकाळपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी कंसात 1 जुनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे.

मिरज 2.3 (519.1), जत झ्र निरंक (185.3), खानापूर-विटा 0.8 (320.4), वाळवा-इस्लामपूर 3.1 (724.6), तासगाव 1.5 (391.1), शिराळा 13.5 (1865.3), आटपाडी - निरंक (184.1), कवठेमहांकाळ 0.8 (296.4), पलूस 1 (425) व कडेगाव 1.6 (691). 

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSangliसांगली