शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

वारणा धरणातून 3400 तर कोयना धरणातून 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 11:17 IST

कोयना धरणातून 2100 क्युसेक्स तर वारणा धरणातून 3400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातील पाणीसाठा 79.56 टी.एम.सी. असून वारणा धरणात 30.53 टी.एम.सी. इतका पाणीसाठा आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत देण्यात आली.

ठळक मुद्देवारणा धरणातून 3400 तर कोयना धरणातून 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरूस्थलांतरीत करण्यात आलेल्या कुटूंबांची संख्या ८१

सांगली कोयना धरणातून 2100 क्युसेक्स तर वारणा धरणातून 3400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणात ८८ टी.एम.सी. पाणीसाठा असून वारणा धरणात 30.53 टी.एम.सी. इतका पाणीसाठा आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत देण्यात आली. 

कोयना पणलोट क्षेत्रात मुसळधार २१३ मी मी पाऊस सुरू आहे. कोयना धरण ८८ टिएमसी भरले आहे. आज दुपारी १ वाजता वक्र दरवाजे उघडणार आहे कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.  सकाळी ७ पर्यंत महाबळेश्वर 213  तर नवजा 155 मी मी पाऊस झाला आहे. पाण्याची आवक 64400 पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एकूण पाणीसाठा 88 टी.एम.सी.झाला आहे. धरणातून वक्रद्वारातून सांडव्यावरून आज 15 ते  20 हजार क्युसेक्स विसर्ग होणार आहे.

सांगली येथील आयर्विन पूल या ठिकाणी पाण्याची पातळी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 34 फूट इतकी आहे. राज्यमार्ग ३, प्रमुख जिल्हामार्ग ८ व ग्रामीण रस्ते ४ पाण्याखाली गेलेले आहेत. सूर्यवंशी प्लॉट, जामवाडी, दत्तनगर, कर्नाळ रस्ता या ठिकाणावरील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

स्थलांतरीत करण्यात आलेल्या कुटूंबांची संख्या ८१असून एकूण व्यक्तिंची संख्या 364 इतकी आहे. महानगरपालिका शाळा क्रमांक 1 व 25 मध्ये एकूण 106 व्यक्तिंना स्थलांतरीत करण्यात आले आहे. उर्वरित व्यक्ती नातेवाईक यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात राहण्यास गेले आहेत. 

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSangliसांगली