शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

टेंभूच्या पाण्यासाठी ३२ गावांचा एल्गार - सर्व निवडणुकांत मतदानावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:04 IST

टेंभूचे पाणी पिण्यासाठी व शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी आंदोलन करण्यात येत आहे तसेच टेंभू पाणी योजनेचा जोपर्यंत लाभ येथील शेतकºयांना मिळत नाही, तोपर्यंत आगामी विधानसभेसह सर्व निवडणुकांत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल,

ठळक मुद्देकुकुडवाड येथे पाणी परिषद : सिंचन योजनेचे पाणी मिळण्यासाठी निर्णायक भूमिका घेणार

कुकुडवाड (जि. सातारा) : कायम दुष्काळी असणाऱ्या माण-खटावला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या दुष्काळी परिस्थितीमुळे लोकशाहीच्या मार्गाने टेंभू योजनेच्या पाण्यासाठी शनिवार (दि.२०) कुकुडवाड येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये खटाव तालुक्यातील मायणी-कलेढोण परिसरातील १६ व माण तालुक्यातील कुकुडवाड परिसरातील १६ अशा एकूण ३२ गावांतील शेतकरी व ग्रामस्थ एकत्र येणार आहेत, अशी माहिती टेंभू पाणी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

टेंभूचे पाणी पिण्यासाठी व शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी आंदोलन करण्यात येत आहे तसेच टेंभू पाणी योजनेचा जोपर्यंत लाभ येथील शेतकºयांना मिळत नाही, तोपर्यंत आगामी विधानसभेसह सर्व निवडणुकांत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा ठाम निर्धार कुकुडवाड ग्रामस्थांनी व परिसरातील लोकांनी एकत्र येऊन केला आहे.

पाणी मिळेपर्यंत हा लढा असाच चालू ठेवण्यात येणार असून, ‘आता नाही तर कधीच नाही,’ असा नारा देत पाण्याच्या संघर्षाला सुरुवात जनतेने केली आहे. दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी टेंभू योजनेचे पाणी कलेढोण व कुकुडवाडसह परिसरातील व शेजारील वाड्यांना वरदान ठरणार आहे. वर्षानुवर्षे चालत आलेला पशुपालक, मेंढपाळ, मातीकाम, रंगकाम आदींचा स्थलांतराचा प्रश्न सुटणार आहे. या योजनेमुळे येथील परिसरातील लोकांचा पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न सुटणार आहे. शेतकºयाचे कोलमडलेले आर्थिक नियोजन सुरळीत होणार आहे.

पाणी संघर्ष समितेचे आवाहनटेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून कुकुडवाडसह परिसरातील वाड्यांचा पाणी प्रश्न मिटणार आहे म्हणून टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी येथील परिसराला देणे गरजेचे आहे, अशी मागणी टेंभू पाणी योजनेपासून वंचित राहिलेल्या कुकुडवाड, कलेढोण परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे तरी कुकुडवाड येथे होणाºया पाणी परिषदेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुकुडवाड टेंभू पाणी संघर्ष समितीने केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीTembhu Projectटेंभू धरण