शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

साखळीचोर टोळीकडून ३२ तोळे दागिने जप्त

By admin | Updated: June 21, 2014 00:22 IST

दुचाकी ताब्यात : १२ गुन्हे उघडकीस; म्होरक्याविरुद्ध १८ गुन्हे

सांगली : रस्त्यावरून एकट्या जाणाऱ्या महिलांवर पाळत ठेवून त्यांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून लंपास करणाऱ्या साखळीचोर टोळीकडून विश्रामबाग, इस्लामपूर व तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२ गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. या टोळीकडून सुमारे ३२ तोळे दागिने व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याची किंमत दहा लाख रुपये आहे. टोळीने कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही गुन्हे केले असण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी दिली. प्रकाश ऊर्फ अण्णा बाबा गवळी (वय २३, रा. संतोषी माता मंदिरजवळ, अहिल्यानगर, सांगली, मूळ गाव बार्शी, जि. सोलापूर), अमित प्रकाश कांबळे (२६), किशोर सुभाष पाटील (२७, दोघे रा. विजयनगर, सांगली) या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने चार दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. प्रकाश गवळी टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्याविरुद्ध सोलापूरमध्ये साखळीचोरीचे सहा गुन्हे नोंद आहेत. तेथील पोलिसांच्या कारवाईचा ससेमीरा मागे लागल्याने तो गतवर्षी सांगलीत आश्रयाला आला. कुपवाड एमआयडीसीतील कारखान्यात तो काम करीत होता. तेथे किशोर पाटील हाही काम करीत होता. यातून दोघांची ओळख झाली. किशोरच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. गवळीने त्याला झटपट श्रीमंत होण्यासाठी चोरीचा मार्ग सांगितला. सोबत त्यांनी अमित कांबळे यालाही घेतले. ही टोळी महिन्यातून किमान दोनवेळा तरी महिलांचे दागिने हिसडा मारून लंपास करत असे. प्रत्येक गुन्ह्यावेळी गवळी आपल्यासोबत किशोर व अमितला नेत असे. दागिने लंपास करण्यापूर्वी ते किमान दोन ते तीन तास विश्रामबाग परिसरात फिरत. गवळी दुचाकीवर मागे बसत असे. तोच दागिने लंपास करत असे. किशोर किंवा अमित दुचाकी चालवत. गुन्हा करताना त्यांनी दोन दुचाकींचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत. वर्षभरात त्यांनी विश्रामबाग हद्दीत आठ, इस्लामपुरात दोन व तासगावमध्ये दोन अशा १२ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या ३२ तोळे दागिन्यांमध्ये गंठण, मंगळसूत्र, सोनसाखळी यांचा समावेश आहे. हे दागिने त्यांनी सांगली परिसरातील सराफास २२ हजार तोळा या दराने विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी या सराफास ताब्यात घेतले असता, त्याने विकत घेतलेले ३२ तोळे दागिने काढून दिल्याने त्याला साक्षीदार करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)