शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

नोकरीचे आमिष दाखवून ३२ लाखांचा गंडा, सांगलीतील आठ तरुणांची फसवणूक 

By शीतल पाटील | Updated: July 10, 2023 19:21 IST

नोकरीसाठी बोलावणे न आल्याने फसवणूक झाल्याचे संबंधितांच्या लक्षात आले.

सांगली : पोस्ट विभासाह शासनाच्या विविध विभागात नोकरीचे आमिष दाखवून सांगली जिल्ह्यातील आठ जणांना तब्बल ३२ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. भामट्याने पोस्ट खात्याचे बोगस नियुक्ती पत्रे डिजीटल शिक्का व बनावट स्वाक्षरी करुन संबंधितांना दिली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मालगाव येथील वैभव आण्णासो बंडगर (रा. मालगाव रोड, आवटी पेट्रोलपंप नजीक ता. मिरज ) याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अतुल उर्फ सागर सुरेश ओमासे (रा. पंचशीलनगर, वाडीकर चाळ, जुना बुधगाव रस्ता सांगली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी ओमासे शहरातील एका खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षकाचे काम करतात. संशयित वैभव बंडगर याचे कवलापूर येथे अक्षरदीप फाऊंडेशन ट्रस्ट तसेच अक्षरदीप शिक्षण संस्था आहे. या माध्यमातून त्याने वरिष्ठ पातळीवर ओळखी असून काही लाख रुपये दिल्यास विविध शासकीय पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्याच्यावर विश्वास ठेवून आठ जणांनी बंडगर याला वेळोवेळी ३२ लाख रुपये दिले.हा फसवणूकीचा सर्व प्रकार मार्च २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत विश्रामबाग परिसरात घडला. संशय येवू नये याकरिता बंडगरने पोस्ट विभागात नोकरीची बनावट नियुक्ती पत्रे दिली. त्याच्यावर डिजिटल शिक्का व बनावट स्वाक्षरी केली. पोस्टामधून नोकरीसाठी बोलावणे न आल्याने फसवणूक झाल्याचे संबंधितांच्या लक्षात आले. त्यांनी संशयित बंडगर याच्याकडे पैशाची मागणी केली. त्याने स्वत: तसेच नातेवाईकांकरवी फिर्यादीसह अन्य सातजणांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे सर्वांनी पोलीस ठाण्यात धाव घेत बंडगर विरोधात फिर्याद दाखल केली.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी