शहरं
Join us  
Trending Stories
1
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
2
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
3
Viral Video : वीटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
4
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
5
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
6
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
7
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
8
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
9
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."
10
"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद
11
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
12
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
13
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
14
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
15
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
16
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
17
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
18
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
19
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
20
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल

मिरजेत ३२ तास मिरवणूक

By admin | Updated: September 28, 2015 23:45 IST

‘मोरयाऽऽ’चा गजर : १८५ मंडळांनी दिला लाडक्या गणरायाला निरोप

मिरज : ‘मोरयाऽऽ’च्या गजरात मिरजेतील १८५ मंडळांच्या गणेशाचे सवाद्य मिरवणुकीने विसर्जन झाले. रविवारी सकाळी सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकीचा तब्बल ३२ तासानंतर सोमवारी दुपारी चार वाजता संत रोहिदास मंडळाच्या गणेश विसर्जनाने समारोप झाला. अनंतचतुर्दशीनिमित्तरविवारी सकाळी आठ वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. नदीवेस येथील शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाचे सर्वप्रथम सकाळी ११ वाजता गणेश तलावात विसर्जन झाले. दुपारपर्यंत शहराच्या विविध भागातून सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका विसर्जन मार्गावर आल्या होत्या. सायंकाळी पोलीस ठाणे ते गणेश तलाव मार्गावर मोठी गर्दी झाली होती. बॅन्ड, बेन्जो, झांजपथक, लेझीम, टाळ-मृदंग, धनगरी ढोल आदी पारंपरिक वाद्यांवार तरुणांचे नृत्य सुरु होते. अनेक मंडळांनी डॉल्बीचाही जोरदार दणदणाट केला. रात्री बारापर्यंत वाद्यांच्या दणदणाटात मिरवणूक मार्ग व मार्केट चौक गर्दीने फुलला होता. ग्रामीण भागातील नागरिकांची मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी होती. मिरवणूक मार्गावरील स्वागत कमानी विद्युत रोषणाईने झगमगत होत्या. रात्री बारा वाजता वाद्ये बंद करण्यात आल्याने मिरवणूक मार्गावरील गर्दी कमी होऊन मिरवणूक गतीने पुढे सरकली. पहाटे पाच वाजता गणेश तलावात त्रिशूल मंडळाच्या मूर्तीच्या विसर्जनाने मिरवणुकीचा समारोप झाला. गणेश तलावात १४५ मंडळांच्या गणेशाचे विसर्जन झाले. मात्र त्यानंतर कृष्णा नदीत विसर्जनासाठी गेलेल्या मोठ्या व उंच गणेश मूर्तींचे क्रेनने विसर्जन करण्यास विलंब होत असल्याने विसर्जन समारोप दुपारी चार वाजेपर्यंत लांबला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संत रोहिदास, श्रीराम, कृष्णेश्वर व कैकाडी समाज मंडळाच्या उंच गणेश मूर्तींचे क्रेनने नदीत विसर्जन होऊन समारोप झाला. (प्रतिनिधी)बंदोबस्तावरील होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यूरविवारी सकाळी मिरवणूक बंदोबस्तासाठी आलेल्या विजय रंगराव पाटील (वय ४०, रा. बेडग) या गृहरक्षक दलातील जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रविवारी सकाळी सात वाजता मिरवणूक बंदोबस्तासाठी आलेले विजय पाटील हजेरी देऊन बंदोबस्त वाटपाच्या प्रतीक्षेत थांबले होते. याचवेळी हृदयविकाराचा झटका आल्याने विजय पाटील यांना खासगी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शेतकरी कुटुंबातील विजय पाटील गेली वीस वर्षे गृहरक्षक दलात काम करीत होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांनी शासकीय रूग्णालयात त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. पोलीस अधीक्षकांनी त्यांना दहा हजार रूपये मदत जाहीर केली.ट्रॉली ताब्यातकृष्णा नदीत पाणी पातळी खालावली असल्याने मोठ्या मूर्ती पाण्यात तरंगत होत्या. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे विसर्जनासाठी नदीत पाणी नसल्याची तक्रार केली. पाणी कमी असल्याने मूर्ती नदीपात्रात वेगवेगळ्या ठिकाणी विसर्जित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महापालिकेने यांत्रिक बोटीतून उथळ नदीपात्रात असलेल्या गणेशमूर्ती खोल पाण्यात नेऊन सोडल्या. नदीत पाणी कमी असल्याने व क्रेनने विसर्जनासाठी विलंब होत असल्याने यावर्षी विसर्जन समारोप गतवर्षीच्या तुलनेत उशिरा झाला. उशिरा विसर्जन केल्याबद्दल पोलिसांनी संत रोहिदास, श्रीराम व कैकाडी समाज मंडळाच्या ट्रॅक्टर-ट्रॉली ताब्यात घेतल्या. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.दोन गटात छायाचित्रावरून मारामारीशिवसेनेच्या स्वागत कमानीवर छायाचित्र नसल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या चंद्रकांत मैगुरे व आनंद रजपूत यांच्या गटात मारामारी झाली. कमान वेस परिसरात दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांत पूर्ववैमनस्यातून हाणामारी झाली. पोलीस ठाण्याजवळ धनगर गल्ली व उदगाव वेस येथील दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांत पुढे जाण्याच्या वादातून मारामारी झाली. मात्र याबाबत पोलिसात तक्रार नसल्याचे सांगण्यात आले. मिरवणूक सुरू असताना रात्री किसान चौकात गर्दीत एक वळू घुसल्याने महिला व बालकांची धावपळ उडाली. या मोकाट वळूला पकडून अन्यत्र नेण्यात आले. मंडळांचे स्वागतमिरवणूक मार्गावर विविध पक्ष, संघटनांतर्फे उभारण्यात आलेल्या स्वागत कमानी व कक्षातून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. सुरेश खाडे, महापौर विवेक कांबळे, महापालिका आयुक्त अजिज कारचे, प्रांताधिकारी सुभाष बोरकर, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, पंडितराव कराडे, गजेंद्र कुळ्ळोळी, मनसेचे दिगंबर जाधव, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, अतिष अग्रवाल, सचिन देशमुख, युवराज काकडे, वसंत अग्रवाल, रिपाइंचे अशोक कांबळे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते स्वागत कक्षात उपस्थित होते.डॉल्बीच्या दणदणाटाने गॅलरी कोसळलीमिरवणुकीत पोलिसांची तीन ध्वनी मापक पथके कार्यरत होती. मात्र पोलिसांचा प्रतिबंध झुगारून अनेक मंडळांनी डॉल्बीचा वापर केला. डॉल्बीच्या दणदणाटामुळे गणेश तलावासमोरील गणेश मंदिराच्या जुन्या इमारतीच्या लाकडी गॅलरीचा काही भाग कोसळला. यामुळे मिरवणूक पाहण्यासाठी थांबलेला एक वृध्द किरकोळ जखमी झाला. मिरवणुकीत डॉल्बीचा वापर करणाऱ्यांविरूध्द कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘शांताबाई, शांताबाई, गाडी सुटली शिट्टी वाजली, पोरी जरा जपून’ ही गाणी सर्वत्र वाजत होती.