शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ३० टन नवीन बेदाण्याची आवक

By अशोक डोंबाळे | Updated: January 31, 2025 21:30 IST

किलोला २२५ ते १९१ रुपये दर : बेदाण्याचे दर तेजीत राहण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज

अशोक डोंबाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली :सांगली मार्केट यार्डात शुक्रवारी निघालेल्या नवीन बेदाणा सौद्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ३० टन बेदाण्याची आवक झाली होती. हिरव्या बेदाण्यास प्रतिकिलो २२५ तर पिवळ्या बेदाण्यास १९१ रुपये दर मिळाला. बेदाण्याचे उत्पादन कमी असल्यामुळे दर तेजीत राहण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

सांगली बाजार समितीमध्ये नूतन बेदाणा सौद्याचा प्रारंभ सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते केला. यावेळी संचालक जयाभाऊ नलवडे, शशिकांत नागे, पप्पू मजलेकर, कडप्पा वारद, सचिव महेश चव्हाण, व्यापारी उपस्थित होते.

शुक्रवारी झालेल्या नवीन बेदाणा सौदा शुभारंभप्रसंगी सात दुकानात ३० नवीन बेदाण्याची आवक झाली. खंडेराजुरीचे शेतकरी प्रमोद चौगुले यांच्या हिरव्या बेदाण्यास प्रतिकिलो २२५ रुपये दर मिळाला. नितीन चौगुले यांच्या हिरव्या बेदाण्यास प्रतिकिलो २२१ रुपये दराने व्यापाऱ्यांनी खरेदी केला. पिवळ्या बेदाण्यास प्रतिकिलो १९१ रुपये दर मिळाला.

यावेळी ज्येष्ठ व्यापारी अशोक बापना, बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार, सतीशभाई पटेल, कांतीबाई पटेल, सुशील हडदरे, कृष्णा मर्दा, रवि हजारे, सौदाप्रमुख देवेंद्र करे, नियमन प्रमुख कुमार दरूरे, अतुल जाधव आदी उपस्थित होते.

बेदाण्याचे प्रतिकिलो दरहिरवा बेदाणा १८० ते २२५ रुपये,मध्यम बेदाणा १३० ते १७० रुपयेकाळा बेदाना ६० ते १०० रुपयेपिवळ्या बेदाणा १८० ते १९१ रुपयेद्राक्ष छाटणी उशिरा झाली आहे. तसेच द्राक्षाचे उत्पादनही कमी आहे. यामुळे दर चांगला असणार आहे. बेदाण्याचेही दर तेजीतच असणार आहेत. शेतकऱ्यांनी सांगली बाजार समितीत जास्तीत जास्त बेदाणा विक्रीस आणावा. - सुजय शिंदे, सभापती, सांगली बाजार समिती.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रSangliसांगली