शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

सांगलीला थांबा नाकारुन रेल्वेचे ३० लाखाचे नुकसान, सहा गाड्यांना थांबा देण्याची मागणी

By अविनाश कोळी | Updated: April 27, 2024 15:47 IST

महाव्यवस्थापकांकडे तक्रार, आंदोलनाचा इशारा 

सांगली : पश्चिम महाराष्ट्रात पुण्याखालोखाल सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सांगलीरेल्वे स्थानकावर थांबा नाकारण्याचा मध्य रेल्वेचा सिलसिला अद्याप सुरूच आहे. नव्याने सहा गाड्यांना अन्यत्र थांबे देताना सांगलीला नाकारल्याने येथील रेल्वे प्रवासी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.सध्या वेगवेगळ्या मार्गांवर उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येत आहेत. यापूर्वी उन्हाळी विशेष गाड्यांना सांगलीत थांबा नाकारला होता. प्रवासी संघटनांच्या संतापानंतर काही गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी हुबळी-मुझफ्फरपूर एक्सप्रेस (गाडी क्र. ०७१५), मुझफ्फरपूर ते हुबळी (गाडी क्र. ०७१६), हुबळी-पटना एक्सप्रेस (गाडी क्र. ०२६८५), पटना ते हुबळी (गाडी क्र. ०२६८६), हुबळी-ऋषिकेश एक्सप्रेस (गाडी क्र. ०६२२५), ऋषिकेश ते हुबळी (गाडी क्र. ०६२२६) या सहा विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक थांबे याला मंजूर असताना केवळ सांगलीचा थांबा नाकारला गेला आहे.प्रवासी संघटनांनी दावा केला आहे की, या सहा गाड्यांना थांबा न दिल्यामुळे सांगलीतून मिळणाऱ्या अपेक्षित ३० लाख रुपयांच्या उत्पन्नावर मध्य रेल्वेने पाणी सोडले आहे. सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच, सांगली रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप, पश्चिम महाराष्ट्र रेल प्रवासी ग्रुप व सांगली चेंबर ऑफ काॅमर्सतर्फे या सहा गाड्यांना त्वरित थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाव्यवस्थापकांकडे तक्रारमध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव व प्रधान मुख्य परिचालन प्रबंधक एस. एस. यादव यांच्याकडे येथील प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगलीचा थांबा नाकारल्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. सांगलीतून धावणाऱ्या गाड्यांच्या उत्पन्नाचे आकडे त्यांनी पत्रात दिले आहेत. प्रत्येक गाडीला विक्रमी उत्पन्न मिळवून देणाऱ्या या स्थानकाला थांबा का नाकारला जात आहे, असा सवालही उपस्थित केला आहे.

आंदोलन करण्याचा इशारानागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगलीला थांबा नाकारणे हा अन्याय आहे. प्रवाशांवर अन्याय करताना रेल्वेच्या उत्पन्नावर पाणी सोडण्याचे कामही या माध्यमातून होत आहे. त्यामुळे तातडीने याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे