शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-पेठ रस्त्याचा ५४३ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 13:35 IST

खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, अशी गेली कित्येक वर्षे स्थिती असलेल्या सांगली-पेठ या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी तब्बल ५४३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसांगली-पेठ रस्त्याचा ५४३ कोटींचा प्रस्तावकेंद्र शासनाच्या रस्ते विकास मंत्रालयाची घोषणा

सांगली : खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, अशी गेली कित्येक वर्षे स्थिती असलेल्या सांगली-पेठ या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी तब्बल ५४३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. संपूर्ण काँक्रिटीकरण व दुभाजकाचा आराखड्यात समावेश आहे. या रस्त्याच्या निधीसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करावी लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू असून अर्थसंकल्पात समाविष्ट झाल्यानंतरच रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.वाहनांची गर्दी, अपघातांचे वाढते प्रमाण, खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे सांगली-पेठ रस्ता नेहमीच चर्चेत राहिला आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दोन वर्षापूर्वी सांगलीपासून पेठपर्यंतच्या नागरिकांनी कृती समिती स्थापन केली होती.

२०१७ च्या दिवाळीच्या पहिल्यादिवशी या रस्त्यावरील खड्ड्यांत दिवे लावून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला होता. या रस्त्यावर आजअखेर कोट्यवधी रुपये खर्च झाले. पण रस्ता कधीच वर्षभरही टिकला नाही.सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेकदा पॅचवर्क केले, पण महिन्याभरात उखडले गेले. सांगली ते तुंगपर्यंतचा रस्ता तर मृत्यूचा सापळा बनला होता. सामाजिक संघटना, कृती समितीने वारंवार आंदोलने केल्यानंतर डिग्रज ते तुंगपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. पण सांगलीवाडी टोलनाका ते डिग्रजपर्यंतचा रस्ता आजही खराब आहे.

तुंगपासून आष्ट्यापर्यंतच्या रस्त्याचे कामही पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी रस्ता चौपदरीकरण, तर काही ठिकाणी तीनपदरी रस्ता आहे. पेठ ते इस्लामपूरपर्यंतचा रस्ताही अरुंद आहे. या रस्त्यावर पुणे-मुंबईकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते.अखेर रस्त्याच्या आंदोलनाला यश येत दोन वर्षापूर्वी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर रस्त्याच्या चौपदरीकरणाची चर्चा सुरू झाली. राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही त्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. अखेर केंद्र शासनाच्या रस्ते विकास मंत्रालयाने या रस्त्याच्या चौपदरीकरणाची घोषणा केली.काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या चौपदरीकरणाचा आराखडा तयार केला. तब्बल ५४३ कोटींचा हा आराखडा केंद्र शासनाला सादर केला आहे. पेठपासून सांगलीवाडीपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. हा संपूर्ण रस्ता काँक्रिटचा असेल. हा रस्ता काळ्या मातीतून जात असल्याने काँक्रिटीकरणाशिवाय पर्याय नव्हता.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकSangliसांगली