शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

..अन् सांगली जिल्ह्यात २८८ जणांचे ग्रामपंचायत सदस्यत्व वाचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 13:46 IST

निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतची नोटीस बजावण्यात आली होती

सांगली : ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन वर्ष होत आले, तरी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, या निर्णयामुळे वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या जिल्ह्यातील २८८ सदस्यांना दिलासा मिळाला आहे. जात वैधता प्रमाणपत्र आता ९ जुलै २०२४ पर्यंत सादर करता येईल.जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ दरम्यान ४४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या निवडणुका १८ डिसेंबर २०२२ रोजी पार पडल्या. काही उमेदवारांनी जात प्रमाणपत्र सादर करण्याबाबत हमीपत्र दिले आहे, तर दहा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या २८८ उमेदवारांनी अजूनही जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अन्वये राखीव जागेतून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.मात्र, लोकशाही प्रणालीमध्ये कुठलाही उमेदवार आपल्या न्याय हक्कापासून वंचित राहू नये, या उद्देशाने प्रमाणपत्र त्यांच्याजवळ नसले तरी ते निवडून आलेल्या दिनांकापासून बारा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. परंतु निवडून आलेल्या अनेक उमेदवारांनी अद्याप प्रमाणपत्र सादर केलेले नाही.जिल्ह्यातील २८८ सदस्यांनी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर अजूनही जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. मात्र, हमीपत्र लिहून दिलेले आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणारे ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच यांच्यावर जिल्हा प्रशासनाकडून कारवाईची सुरुवात करण्यात येणार होती. त्यासाठी संबंधित तहसील कार्यालयांकडे संबंधित अहवाल मागवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. अहवाल मागविल्यानंतर या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता होती. मात्र, त्यापूर्वीच सरकारने आदेश काढल्याने या सदस्यांना वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ९ जुलै २०२४ पर्यंत मुदतवाढ मिळाल्याने त्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायत