शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनमधून २५० भारतीय विद्यार्थी सुखरुप परतले; मंत्री कदमांनी केले शिवांजली, ऐश्वर्यांचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 12:17 IST

मुलांना एवढ्या मोठ्या संकटातून जीव मुठीत धरून सुखरूप आलेले पाहून कुटुंबियांना अश्रू अनावर

प्रताप महाडीककडेगाव : रशिया युक्रेनच्या युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्याचे काम ऑपरेशन गंगा मोहीमे अंतर्गत  सुरूच आहे. काल, रविवारी सुरक्षितरित्या पोहचलेल्या २५० भारतीय विद्यार्थ्यांपैकी कडेगाव तालुक्यातील शिवांजली दत्तात्रय यादव व ऐश्वर्या सुनील पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील ९ विद्यार्थ्यांचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.पालकांनी विद्यार्थ्यांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. आपल्या मुलांना एवढ्या मोठ्या संकटातून जीव मुठीत धरून सुखरूप आलेले पाहून कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनीही कुटुंबियांच्या समवेत हा आनंदाचा क्षण अनुभवून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.पुणे येथे  परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कडेगाव तालुक्यातील ऐश्वर्या व शिवांजली या दोघींसह  देवरुख येथील ३, बार्शी येथील २ तर कराड व लातूर येथील प्रत्येकी एक अशा ९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुण्यात  सुखरूप परतलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून पहायला मिळाला.महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य शासनाचे विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांशी थेट संपर्क साधून गरजेनुसार त्यांना सर्वोतोपरी मदत व मार्गदर्शन केले जात आहे असे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले...यामुळे आम्ही सुखरूप परतलो शिवांजली यादव  युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने सर्वत्र अत्यंत भीतीदायक व दहशतीचे वातावरण आहे.आम्ही आशा स्थितीत आम्ही  धाडसाने बाहेर पडलो आणि हंगेरीत पोहोचलो. तेथे केंद्र सरकार व  भारतीय दूतावासाने केलेली मदत व महाराष्ट्र शासनाची भक्कम साथ व संपर्कासाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आम्ही सुखरूप परतलो आहोत. राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सातत्याने आमच्याशी संपर्क साधून वेळीवेळी मार्गदर्शन केले व आम्हाला दिलासा  दिला अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया शिवांजली यादवने दिली.

टॅग्स :SangliसांगलीRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया