शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

पाडव्याला जिल्ह्यात उडाला २५० कोटींच्या उलाढालीचा बार

By admin | Updated: November 2, 2016 00:13 IST

खरेदीचा उत्साह : इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहने, सोने-चांदी, कपड्यांची मोठी खरेदी; कंपन्यांच्या आॅफर्सचा फायदा

सांगली : विद्युत रोषणाईने सजलेली दुकाने, वेगवेगळ््या आॅफर्सचे झळकणारे फलक, सेवा-सुविधांची रेलचेल अशा वातावरणात दिवाळी पाडव्याच्या खरेदीचा उत्साह सर्वत्र दिसून आला. सोमवारी दिवसभर खरेदीसाठी सांगलीच्या बाजारपेठा, वाहनांचे शोरुम्स्, मॉल्समध्ये ग्राहकांची गर्दी होती. विविध क्षेत्रात सुमारे अडीचशे कोटींची उलाढाल झाल्याची माहिती विक्रेत्यांकडून मिळाली. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या दिवाळी-पाडव्याला शहरातील बाजारपेठ फुलून गेली होती. सोने-चांदी, दुचाकी, चारचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक व गृहोपयोगी वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. नवीन फोर के तंत्रज्ञानाच्या एलईडी आणि फोर-जी मोबाईलवर ग्राहकांच्या उड्या पडल्या, तर सोन्याचा दर दहा ग्रॅमला ३० हजार ७०० च्या आसपास असल्याने, सराफ कट्ट्यावरही गर्दी उसळली होती. परिणामी सोन्याची विक्रमी उलाढाल झाली. दिवाळी-पाडव्याचा मुहूर्त साधून बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. वेगवेगळ्या आॅफर्स देण्यात आल्याने खरेदीला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या आॅफर्समध्ये लॅपटॉप, मोबाईल, टॅब यासह एलईडी टीव्ही, फ्रीजचा समावेश होता. वाहनांच्या खरेदीलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. मोफत घरपोच सेवाही अनेकांनी उपलब्ध करून दिली होती. बाजारपेठेत ग्राहकांचा स्मार्ट फोन खरेदीकडे ओढा होता. आॅनलाईनच्या जमान्यातही दुकानात जाऊन मोबाईल खरेदीला ग्राहकांनी प्राधान्य दिले. यंदा फोर-जी तंत्रज्ञानासह मोठ्या रॅम, प्रोसेसर आणि ब्रॅन्डेड कंपन्यांच्या मोबाईलची खरेदी प्रामुख्याने झाली. आॅनलाईन मार्केटच्या आॅफर्सना टक्कर देण्यासाठी शहरातील मोबाईल विक्रेत्यांनीही ग्राहकांना चांगल्या आॅफर देऊ केल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत दुकाने ग्राहकांनी फुलून गेली होती. मोबाईलच्या दुकानातही ग्राहकांना खरेदीसाठी तास-तासभर थांबावे लागत होते. दिवाळीच्या मुहूर्तावर शहरात वाहन खरेदीची धूम दिसून आली. दसरा ते दिवाळीदरम्यान चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या विक्रीत २५ टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात आले. चारचाकी वाहनांसाठी तर दिवाळीपूर्वीच बुकिंग झाले होते. मोठ्या वाहनांच्या खरेदीवर पाच हजारापासून ते चाळीस हजारापर्यंत सवलती देण्यात आल्या होत्या. मोफत विमा, मोफत सेवा अशा आॅफर दिल्याने, आॅटोमोबाईल क्षेत्रात उत्साह दिसून आला. आॅनलाईन खरेदी करणाऱ्यांचे प्रमाणही यंदा मोठे होते. काही कुरिअर कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली असता, गतवर्षाच्या तुलनेत यंदा आॅनलाईन खरेदीचे प्रमाण अधिक होते. (प्रतिनिधी) मोबाईल खरेदीसाठी गर्दी मोबाईल खरेदीसाठी सांगली, मिरजेतील दुकानांमध्ये मोठी गर्दी होती. दुचाकी, चारचाकी व अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या तुलनेत मोबाईलच्या किमती कमी असल्याने एकूण उलाढाल कमी दिसत आहे. तरीही नगांचा विचार केला, तर मोबाईलची विक्री सर्वाधिक दिसून येते. महिनाअखेर असल्यामुळे सुरुवातीला पाडव्यादिवशी होणाऱ्या उलाढालीविषयी शंका निर्माण झाली होती, मात्र दिवाळी सुरु झाल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळाला. पाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही एकूण १ हजार २00 दुचाकी वाहनांची विक्री केली. दसरा आणि दिवाळीची एकूण वाहनविक्री ३ हजार २00 वर झाली आहे. यंदा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद दिसून आला. खरेदीदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. गतवर्षाच्या तुलनेत विक्रीमध्ये वाढ झाली आहे. - श्रीकांत तारळेकर, संचालक, सिद्धिविनायक अ‍ॅटो, सांगली मोबाईल आणि टीव्हीला ग्राहकांची मोठी मागणी होती. पाडव्याच्या मुहूर्तावर एलईडी टीव्ही खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल होता. गतवर्षाच्या तुलनेत यंदा टीव्हीच्या किमती सुमारे २० टक्क्यांनी कमी झाल्याने मोठ्या आकारातील टीव्हींना अधिक पसंती दिली जात होती. मोबाईल कंपन्यांनी पाडव्यासाठी अनेक आॅफर दिल्या असल्यामुळे ग्राहकांनी फोर जी तंत्रज्ञानाच्या मोबाईलची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. तुलनेने होमअप्लायंसेसना मागणी कमी होती. - विजय लड्डा, संचालक, सुयोग राजेंद्र डिजिटल, सांगली