शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेवर २५० कोटींचा बोजा, आणखी ३५० कोटी आणणार कोठून?

By शीतल पाटील | Updated: December 4, 2023 16:21 IST

चांदोली धरणातून पाणी आणण्यात अडथळ्यांची शर्यत

शीतल पाटीलसांगली : महापालिकेच्या उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ गेल्या २५ वर्षांत कधीच जमलेला नाही. सांगली- मिरज ड्रेनेज, कुपवाड ड्रेनेज, एलईडी प्रकल्प, शेरीनाला एसटीपी यासाठी महापालिकेवर आधीच २५० कोटींचा बोजा आहे. त्यात चांदोली धरणातून पाणी आणण्यासाठी किमान १२०० कोटी लागतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. या प्रकल्पासाठी महापालिका हिश्श्यापोटी ३५० कोटींची तरतूद करावी लागणार आहे. हा निधी आणणार कोठून, असा प्रश्न आहे. त्यामुळे चांदोली धरणातून पाणी आणण्यात महापालिकेला अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागणार आहे.

चांदोली धरणातून पाणी की वारणा नदीतून हा वाद सध्या जोरदार पेटला आहे. वारणा नदीतून पाणी आणण्यासाठी आठ किलोमीटरची पाईपलाईन टाकावी लागणार आहे. याशिवाय १३ पाण्याच्या टाक्या, जुन्या पाईपलाईन बदलण्यासह २५० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानंतर चांदोली धरणातून पाणी आणण्याची मागणी होऊ लागली. त्याचे सादरीकरणही झाले. काही तज्ज्ञांनी या प्रकल्पाचा खर्च ४०० कोटी, ६३३ कोटी इतका होईल, असा अंदाज व्यक्त केला; पण महापालिका प्रशासनाला मात्र १२०० कोटी लागतील, असे वाटते.सध्या कुपवाड ड्रेनेज योजनेसाठी महापालिकेला ९० कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. याशिवाय मिरज ड्रेेनेजसाठी अतिरिक्त ८ कोटी लागतील. शेरीनाला एसटीपीचा ९३ कोटींचा प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यात शंभर टक्के अनुदान मिळणार की महापालिकेला ३० टक्के वाटा उचलावा लागणार हे अजून निश्चित नाही. महापालिकेचा हिस्सा जवळपास २७ कोटींच्या घरात जातो. एलईडी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्पही ११३ कोटींच्या वर पोहोचला आहे. एकूण आधीच महापालिकेवर २५० कोटींचा बोजा आहे. महापालिकेचे दरवर्षीचे उत्पन्न २०० कोटींच्या घरात आहे. याशिवाय ठेकेदारांची देणीही २५ कोटी आहेत. इतका आर्थिक बोजा असताना चांदोली धरणातून पाणी प्रकल्पाचा ३५० कोटींचा बोजा महापालिकेला परवडणार नाही, असाच सूर आहे.

मग मिरजेने काय पाप केले?चांदोली धरणातून सांगली व कुपवाडसाठी पाणी आणण्याचा विचार पुढे आला. त्यासाठी कृष्णा व वारणा नदीच्या प्रदूषणाचे कारण दिले जात आहे. महापालिकेत मिरज शहराचाही समावेश होता. मिरजेला वारणा नदीतून पाणी दिले जाते. वारणा नदी प्रदूषण होत असेल तर मग मिरजकरांना चांदोलीतून पाणी दिले पाहिजे. मिरजकरांनी काय पाप केले आहे? असा प्रश्नही भविष्यात उपस्थित होऊ शकतो.

महापालिकेचे उत्पन्न (आकडे कोटीत)

  • २०१९-२०२० : १२९.०६
  • २०२०-२०२१ : १४४.१
  • २०२१-२०२२ : १६४.७१
  • २०२२-२०२३ : १८०.२५

उत्पन व खर्चाची आकडेवारी

  • विभाग जमा खर्च
  • जलनिस्सारण २.४६, ६.८१
  • पाणीपुरवठा : २२.२८, ३८.५९
  • आरोग्य : ४.२२, ४४.०६
  • विद्युत : ०, १०.२६
टॅग्स :Sangliसांगली