शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा खोऱ्यातील २५ हजार प्रकल्पग्रस्तांना अनुदान मिळणार, भारत पाटणकर यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:04 IST

पुण्यात कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

सांगली : कृष्णा खोऱ्यातील विविध प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्तांना २०१४ नंतरच्या लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी एक लाख ६१ हजार ४०० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. यामध्ये पूर्वी लाभार्थ्यांना राज्य सरकारने १० हजार रुपये दिले आहेत. हे पैसे वगळून एक लाख ५१ हजार ४०० रुपये कृष्णा खोऱ्यातील २५ हजार लाभार्थ्यांना मिळणार आहेत, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासाठी पुणे येथे बुधवारी बैठक झाली. या बैठकीनंतर डॉ. पाटणकर यांनी माहिती दिली. यावेळी कृष्णा खोरेचे महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, सातारा पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे आदी उपस्थित होते.

डॉ. पाटणकर म्हणाले, प्रकल्पग्रस्तांसाठी घरबांधणीच्या अनुदानाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या प्रश्नावर अनेक आंदोलने, मोर्चे झाले आहेत; पण यावर ठोस निर्णय होत नव्हता. राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर बुधवारी पुणे येथे अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीस प्रमुख सर्व अधिकारी होते.२०१४ च्या शासन आदेशानुसार प्रकल्पग्रस्तांना घरबांधणीचा लाभ देण्याचा निर्णय झाला आहे. २०१४ नंतर घरकुल बांधले आहे; पण त्या लाभार्थ्यांना केवळ १० हजार रुपयेप्रमाणेच अनुदान मिळाले आहे. या लाभार्थ्यांसाठी एक लाख ५१ हजार ४०० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या निर्णयाचा कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील २५ हजार लाभार्थ्यांना होणार आहे.यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे संतोष गोटल, दिलीप पाटील, शरद जांभळे, अंकुश शेडगे, आनंदा सपकाळ, प्रकाश भातुसे, देवानंद कदम, बाजीराव पन्हाळकर, मोहन धनवे, प्रकाश सोरटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रकल्पग्रस्ताच्या बैठकीत या प्रश्नावरही चर्चाबैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रकारच्या प्रश्नांवर महत्त्वाचे निर्णय झाले. त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या गावठाणांचे सीमांकण करणे, कमी-जास्त पत्रक करून व नागरी सुविधा पूर्ण करून जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण करणे, प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या जमिनींना प्राधान्याने सिंचनाची सोय करणे, धरणांच्या भोवताली संपादन क्षेत्रातील अतिक्रमणे काढणे, असेही निर्णय घेण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. पाटणकर यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगली