शिराळा : शिराळा तालुक्यातील ४९ पाझर तलावांपैकी २२ तलाव कोरडे पडले आहेत, तर १८ तलावात ३० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. शिंदेवाडी येथील तलावातील पाणीसाठा नोव्हेंबरमध्येच पूर्ण कोरडा पडला आहे. सध्या या गावास टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. याचबरोबर आटुगडेवाडी, धुरंदेवाडी, धसवाडी, कुसळेवाडी यासह मेणी खोऱ्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यात ४९ पाझर तलाव असून, यापैकी निगडी (जुना), बेलदारवाडी, कोंडाईवाडी क्र. २, हत्तेगाव (अंबाबाईवाडी), शिरसटवाडी, चरणवाडी नं. १, औंढी, शिरशी जुना, शिरशी (भैरवदरा), शिवरवाडी, पावलेवाडी नं. १, शिरशी (काळखिंड), भैरेवाडी, तडवळे नं. १, पावलेवाडी नं. २, भटवाडी, प. त शिराळा नं. २, करमाळे नं. २, निगडी (खोकडदरा), लादेवाडी, इंग्रुळ, सावंतवाडी हे २२ तलाव कोरडे पडले आहेत, तर पाडळी (३० टक्के), प. त. शिराळा नं. १ (१० टक्के), करमाळा नं. १ (४० टक्के), खेड (३० टक्के), पाडळीवाडी (२५ टक्के), वाकुर्डे खुर्द (३५ टक्के), अंत्री खुर्द (५० टक्के), निगडी (महादरा २५ टक्के), आटुगडेवाडी-मेणी (३० टक्के), वाडीभागाई (६० टक्के), तडवळे (वाडदरा २० टक्के), हत्तेगाव (८० टक्के), गवळेवाडी उंदीर खोरा (३० टक्के), गवळेवाडी बहीरखोरा (४० टक्के), धामवडे कुंडनाला (३० टक्के), मेणी साक्रुंपीनाला (२० टक्के), बादेवाडी वाकुर्डे खुर्द (२० टक्के), शिरशी कासारकी (१० टक्के) कोंडाईवाडी नं. १ (३० टक्के), चव्हाणवाडी (३० टक्के), वाकुर्डे बुद्रुक जामदाड (२० टक्के), कापरी (२० टक्के), बिऊर (३० टक्के), खिरवडे (४० टक्के), पाचुंब्री (३० टक्के), भाटशिरगाव (२५ टक्के), रेड क्र. २ (४५ टक्के) असा पाणीसाठा शिल्लक आहे. चांदोली धरण हे अनेक जिल्ह्यांची वरदायिनी ठरलेले धरण आहे. तालुक्यात मात्र याच धरणाजवळील मेणी खोऱ्यातील अनेक गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. (वार्ताहर)टँकरमुक्त तालुक्यात टँकरशिंदेवाडी येथे पाझर तलावाचे काम निकृष्ट झाले आहे. खराब बांधकामामुळे गेली १२ वर्षे येथील तलाव नोव्हेंबरमध्ये कोरडाच पडतो. याबाबत पाटबंधारे विभागाला कोणतेही गांभीर्य नाही. तलावात योग्य प्रमाणात पाणीसाठाच होत नाही. गळती काढण्यासाठीही कोणत्याही हालचाली नाहीत. आजवर टॅँकरमुक्त अशी ओळख असलेल्या शिराळा तालुक्यातील या गावास टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. धुरंदेवाडी, आटुगडेवाडी, धसवाडी, कुसळेवाडीसह अनेक वाड्यांमध्ये पाणीटंचाई भासत आहे.
शिराळ्यात २२ तलाव कोरडे
By admin | Updated: May 26, 2015 00:54 IST