शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सांगली जिल्ह्यात यंदा २२ अपघातस्थळे नामशेष करणार, गतवर्षी ३४४ जणांचा अपघाती मृत्यू

By हणमंत पाटील | Updated: January 18, 2024 15:14 IST

सांगली : जिल्ह्यात गतवर्षात ३४४ जणांचा अपघाती मृत्यू झाला. तर अपघातामध्ये ६२८ जणांना अपंगत्व आले. अपघाताची वेगवेगळी कारणे असली ...

सांगली : जिल्ह्यात गतवर्षात ३४४ जणांचा अपघाती मृत्यू झाला. तर अपघातामध्ये ६२८ जणांना अपंगत्व आले. अपघाताची वेगवेगळी कारणे असली तरी वारंवार अपघात होणारे ‘ब्लॅक स्पॉट’ही कारणीभूत आहेत. गतवर्षात उपप्रादेशिक परिवहन विभाग, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभागाने ३६ पैकी १४ ‘ब्लॅक स्पॉट’ नामशेष केले. तर यंदाच्या वर्षात २२ ‘ब्लॅक स्पॉट’ कमी करून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.जिल्ह्यातील वाहनवाढीचा वेग कायम असून त्याचबरोबर वाहनांची गतीही वाढत आहे. वेगाने आणि बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. दारूच्या नशेत वाहन चालवणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, नादुरुस्त वाहनांचा वापर करणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करणे ही कारणेदेखील अपघातास कारणीभूत ठरतात. या कारणांबरोबर बऱ्याचदा धोकादायक वळण, अरुंद पूल, अरुंद रस्ता, धोकादायक चढ-उतार अशा प्रकारचे रस्तेही अपघातास कारणीभूत ठरतात.अशा धोकादायक ठिकाणांना ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणतात. गेली अनेक वर्षे अशा ठिकाणी सावधानता बाळगा असे सांगणारे फलक झळकत होते. परंतु आता फलक लावण्यापेक्षा ही ठिकाणेच नष्ट करून तेथे सुरक्षित वाहतूक होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग सुरू झाल्यामुळे या रस्त्यावर जिल्हा हद्दीत पूर्वी होणारे अपघातांचे प्रमाण थोडे घटले आहे. या महामार्गावरील तसेच इतर ठिकाणचे १४ ‘ब्लॅक स्पॉट’ कमी केले आहेत. आता उर्वरित २२ ठिकाणे कमी केली जातील. त्यामुळे अपघात कमी होतील.

‘ब्लॅक स्पॉट’ कसे होतात?जर एखाद्या मार्गावर पाचशे मीटरच्या अंतरात वारंवार अपघात होऊन पाच किंवा पाचपेक्षा जास्त जणांचा अपघाती मृत्यू झाला किंवा दहा जण जखमी झाले तर तो ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून जाहीर केला जातो. जर याठिकाणी उपाययोजनानंतर अपघात न झाल्यास तो आपोआप यादीतून वगळला जातो.

जिल्ह्यात येथे ‘ब्लॅक स्पॉट’सद्यस्थितीत पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर १० अपघाताची ठिकाणे आहेत. तसेच रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ५ ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत. तसेच इतर सात ठिकाणी अपघातस्थळे आहेत. यंदाच्या वर्षात ही अपघातस्थळे नाहीशी करण्यावर भर राहणार आहे.

अपघाताचे चित्रवर्ष - अपघात - बळी - गंभीर जखमी२०२१ - ६५५ - ३१७ - ६१२२०२२ - ७२० - ३७३ - ६६७२०२३ - ७२७ - ३४४ - ६२८

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात