शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: रेणावीत रविवारी २१ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

By हणमंत पाटील | Updated: December 8, 2023 11:43 IST

अरविंद पुजारी, मनीषा पाटील, मंदाकिनी सपकाळ यांना पुरस्कार जाहीर

खानापूर : रेणावी येथील श्रीमती शहाबाई यादव सांस्कृतिक, साहित्य, कला विकास मंचच्या वतीने २१ वे ग्रामीण साहित्य संमेलन १० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात ‘श्रीमती शहाबाई यादव साहित्य गौरव पुरस्कारा’ने ज्येष्ठ लेखक अरविंद पुजारी, मनीषा पाटील आणि मंदाकिनी सपकाळ यांना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती मंचचे सचिव धर्मेंद्र पवार व निवड समितीचे अध्यक्ष प्रा. संजय ठिगळे यांनी दिली.यंदाच्या पुरस्काराचे मानकरी असलेले अरविंद पुजारी यांची साहित्यकृती, साहित्यविचार आणि साहित्य समीक्षा याचे महाथोर वाचक अशी ओळख आहे. दुसऱ्या मानकरी देशिंग- हरोली येथील श्री महालक्ष्मी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या अध्यापिका कवयित्री मनीषा पाटील-हरोलीकर आहेत. ‘पायवाटेवरील दिवे’, ‘माती विश्व’, ‘नाती वांझ होताना’ हे कवितासंग्रह तसेच विचार मंथन हा भाषणसंग्रह प्रकाशित झालेला आहे. अभिव्यक्ती साहित्य प्रतिष्ठानच्या त्या संस्थापक अध्यक्षा आहेत. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

देवराष्ट्रे येथील मंदाकिनी दत्तात्रय सपकाळ या महाराष्ट्ररत्न वि. स. पागे कृषी माध्यमिक विद्यानिकेतन, तासगाव येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. ''लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : जीवन व कार्य'' हे चरित्र पुस्तक त्यांनी लिहिले आहे. मराठी व हिंदी विषयात त्यांनी कविता लिहिल्या आहेत. निबंध स्पर्धेत "अण्णा भाऊ साठे" या विषयात प्रथम क्रमांक मिळविला. निर्मिती विचारमंच राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. सुजन फाउंडेशन आयोजित अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावला आहे.रविवार १० डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता रेणावी येथे होणाऱ्या २१ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे धर्मेंद्र पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली