शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

21 वर्षीय माथेफिरू युवकाचा तरुणीवर तलवारीनं वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 18:54 IST

ताकारी (ता. वाळवा, जि. सांगली) येथे शनिवारी रात्री एकतर्फी प्रेमातून एका 21 वर्षीय माथेफिरू युवकाने संबंधित मुलीच्या घरात घुसून तलवारीने हल्ला चढवला.

इस्लामपूर : ताकारी (ता. वाळवा, जि. सांगली) येथे शनिवारी रात्री एकतर्फी प्रेमातून एका 21 वर्षीय माथेफिरू युवकाने संबंधित मुलीच्या घरात घुसून तलवारीने हल्ला चढवला. यामध्ये या 21 वर्षीय युवतीच्या डोक्यात तलवारीचा वार वर्मी बसल्याने ती गंभीर जखमी झाली, तर तिचा भाऊही या हल्ल्यात जखमी झाला. शनिवारी रात्री 8च्या सुमारास हा हल्ला झाल्यानंतर ताकारीत खळबळ उडाली होती. हल्ल्यानंतर तलवार आणि चाकू टाकून हल्लेखोराने पलायन केले.ऐश्वर्या प्रकाश पवार (21) आणि अश्विन प्रकाश पवार (19) अशी जखमी बहीण भावाची नावे आहेत. ऐश्वर्यावर क-हाडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असून, ती अद्याप बेशुद्धावस्थेत आहे. अश्विन याला उपचारानंतर घरी सोडले आहे. ऐश्वर्या ही इस्लामपूर येथील महाविद्यालयात शास्त्र शाखेच्या पदवीच्या तिस-या वर्षात शिकत आहे. याबाबतची माहिती अशी, हल्लेखोर शुभम राजेंद्र पवार (21) हा गेल्या दोन वर्षांपासून ऐश्वर्याला त्रास देत आहे. यापूर्वी त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल झाल्याचे समजते. मात्र तरीही त्याने ऐश्वर्याला त्रास देणे थांबवले नव्हते.ऐश्वर्या ही आपली आजी, आजोबा, आई व दोन लहान भावांसमवेत कालव्याच्या वरच्या परिसरात राहते. तिचे वडील प्रकाश पवार हे कामानिमित्त मुंबईत वास्तव्यास असतात. हल्लेखोर पवार हा दत्त मंदिरानजीक राहतो. शनिवारी रात्री ऐश्वर्या आपल्या घरात कुटुंबीयांसह बोलत बसली होती. घराचा दरवाजा पुढे ढकलण्यात आला होता. त्यावेळी हल्लेखोर पवार हा तलवार हातात घेऊन थेट त्यांच्या घरात घुसला व तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणत त्याने अश्विनच्या डोक्यात आणि कमरेवर वार केले. यादरम्यान ऐश्वर्या व आजीमध्ये पडल्यावर, आजीला ढकलून शुभम पवार याने थेट ऐश्वर्याच्या डोक्यात तलवारीचा वार केला. यामध्ये ती रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली.हल्ल्यानंतर आरडाओरडा झाल्याने शेजारी धावत आले. त्यांना पाहून शुभम पवार याने तलवार आणि चाकू तेथेच टाकून पलायन केले. त्यानंतर दोघांना उपचारासाठी क-हाडला हलविण्यात आले. अश्विन पवार याने फिर्याद दिली आहे. हल्लेखोर शुभम पवार याच्याविरुद्ध, घरात घुसून खुनाचा प्रयत्न करणे, प्राणघातक हत्यारे बेकायदेशीरपणे बाळगणे अशा कलमांखाली गुन्हा नोंद झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Sangliसांगली