शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने मानधन देण्यासाठी दिंड्यांची माहिती मागवली; नोंदणीपत्र, व्यसनमुक्तीच्या उपक्रमांची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 15:57 IST

सांगली जिल्ह्यातील तब्बल ८०० वारकरी दिंड्यांना २० हजार रुपयांचे मानधन मिळणार

सांगली : पंढरपूरला जाणाऱ्या दिड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे मानधन देण्याची घोषणा शासनाने केली आहे. त्या अनुषंगाने राज्यभरातील दिंड्यांची माहिती दिंडी संयोजकांकडून मागविली आहे.सांगली जिल्ह्यातील तब्बल ८०० वारकरी दिंड्यांना २० हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे. त्यानुसार दिंड्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. शासनाने राज्यभरातील दिंड्यांसाठी १८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अनुदानासाठी गेल्या सहा वर्षांपासून वारकरी साहित्य परिषदेकडून पाठपुरावा सुरू होता. प्रत्येक दिंडीला ५० हजार रुपयांची मागणी केली होती, त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी २० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता माहिती मागविण्यात आली आहे.सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अवर सचिव प्रशांत वाघ यांनी साहित्य परिषदेला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आषाढी वारीमध्ये किती दिंड्यांचा समावेश असतो याची माहिती द्यावी. प्रत्येक दिंडीचे नोंदणीपत्र, दिंड्यांच्या प्रभारींचे आधार कार्ड, दिंड्यांच्या नावाचे बँक खाते, आदी तपशील तातडीने द्यावा.वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सांगितले की, अधिकाधिक दिंड्यांना मानधनाचा लाभ व्हावा असा प्रयत्न आहे. आषाढी वारीतील प्रत्येक दिंडीला मानधन देण्यासाठी शासनाने प्रस्ताव मागविले आहेत. दरम्यान, शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांनी या निर्णयाबद्दल शासनाचे आणि वारकरी साहित्य परिषदेचे अभिनंदन केले. पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मानधनाची योजना अमलात आल्याचे पक्षाच्या बैठकीत सांगितले.

मानधनासाठी व्यसनमुक्तीचा निकषदरम्यान, दिंड्यांना मानधन देण्यात येणार असले, तरी त्यासाठी व्यसनमुक्तीचा निकष लावला जाणार आहे. व्यसनमुक्तीसाठी प्रबोधनाचा उपक्रम सामाजिक न्याय विभाग राबवते. त्यामुळे दिंड्यांकडून वारीच्या सोहळ्यात व्यसनमुक्तीसाठी कोणते उपक्रम राबविले जाणार आहेत याचीही माहिती द्यावी, अशी सूचना शासनाने केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Governmentसरकार